News Flash

आठवडाभरात कळंबोली जम्बो रुग्णालय सेवेत

६३५ खाटांच्या जंबो कोविड केंद्रामध्ये ५०५ प्राणवायू खाटा, अतिदक्षता विभागात १३० खाटा असणार आहेत.

आठवडाभरात कळंबोली जम्बो रुग्णालय सेवेत

पनवेल महापालिका व सिडको अधिकाऱ्यांकडून पाहणी

पनवेल : २३ कोटी रुपये खर्च करून करोना साथरोगाच्या तिसऱ्या लाटेसाठी बनविण्यात आलेले कळंबोली सीसीआय गोदामात ६३५ खाटांचे जम्बो करोना रुग्णालय पुढील आठवडय़ात सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवारी पनवेल पालिकेचे आयुक्त आणि सिडको मंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त पाहणी केली.

हे रुग्णालय बांधण्याचे काम सिडकोवर सोपविले होते. त्यानुसार सिडकोने गेल्या आठवडय़ात पत्र देऊन त्याचे काम पूर्ण झाल्याचे पनवेल पालिकेला कळवले होते. त्यामुळे सोमवारी सिडको मंडळाचे अधिकारी व पनवेल पालिकेचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी केली.

या ६३५ खाटांच्या जंबो कोविड केंद्रामध्ये ५०५ प्राणवायू खाटा, अतिदक्षता विभागात १३० खाटा असणार आहेत. यावेळी पनवेल पालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके,उपायुक्त सचिन पवार,  महापालिका मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सिडको मुख्य अभियंता राजेंद्र धायटकर, अधीक्षक अभियंता रमेश गिरी ,सिडको कार्यकारी अभियंता डी.एम. बोकाडे, कार्यकारी अभियंता यासीन मापरा, साहाय्यक कार्यकारी अभियंता अरविंद जाधव, साहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश थासले पालिका अधिकारी, सिडको अधिकारी उपस्थित होते.

बाधितांच्या दोन्ही हातांवर शिक्के

गृहविलगीकरणातील बाधितांच्या दोन्ही हातांवर शिक्के मारण्यात येत आहेत. अनेक गृहविलगीकरणातील रुग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी पनवेल पालिकेकडे आल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जम्बो कोविड केंद्राची पाहणी केली असून पुढील तीन दिवसांत आयटी व वैद्यकीय अधिकारी, सिडको अधिकाऱ्यांसोबत संयुक्तपणे रुग्णालय हस्तांतरण प्रक्रिया पार पाडतील. त्यानंतर हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात आल्यावर रुग्णालय सुरू करणार आहोत. एकाच छताखाली पालिका क्षेत्रातील बाधितांना चांगले उपचार मिळावेत हीच अपेक्षा आहे.

-गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल पालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2021 1:59 am

Web Title: kalamboli jumbo hospital service throughout week ssh 93
Next Stories
1 ‘एपीएमसी’ला १७५ एकर जागाही अपुरी
2 ताईंची (पुन्हा) खदखद
3 ऐरोली नाटय़गृहाच्या भूमिपूजनावरून वाद
Just Now!
X