27 October 2020

News Flash

पावसाळ्यापूर्वी रस्ते सज्ज ठेवा

काही दिवसावर पावसाळा आला आहे. गेली आठ महिन्यांपासून शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू आहे.

(संग्रहित छायाचित्र)

वाहतूक विभागाचे नियोजन; सार्वजनिक बांधकामसह दोन्ही महापालिकांना कामे संपविण्याच्या सूचना

नवी मुंबईत महामार्गासह अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. पावसाळा तोंडावर आला असून या कामांमुळे वाहतुकीवर परिणाम होणार असल्याने कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत, अशी विनंती लेखी पत्राद्वार वाहतूक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागासह नवी मुंबई व पनवेल महापालिकेला केली आहे.

काही दिवसावर पावसाळा आला आहे. गेली आठ महिन्यांपासून शीव-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण सुरू आहे. दरवर्षी पावसाळ्यात या महामार्गावर जागोजागी खड्डे पडून मोठी वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे डांबरीकरण असलेल्या ठिकाणी कॉंक्रीटीकरण सुरू आहे. काही ठिकाणी वेगाने कामे सुरू आहेत. काही ठिकाणची कामे उरकली आहेत. यामुळे कामे सुरू झाल्यापासून महामार्गावरील वाहतूक मंदावली असून वाहतूक कोंडीचा सामनाही प्रवाशांना करावा लागत आहे. सध्या वाशी गावाजवळ पुण्याच्या दिशेने मूळ असलेला तीन पदरी रस्ता पाच पदरी करण्याचे काम सुरू आहे.

यासह पालिका हद्दीत येणारा ठाणे-बेलापूर मार्ग तसेच शहराअंतर्गत रस्त्यांचीही कामे सुरू आहेत. पनवेल महापालिकाअंतर्गत उपनगरांत व सिडकोअंतर्गत उलवे व विविध नोडमधील कामे सुरू आहेत. पावसाळ्यात रस्ते चांगले व खड्डे विरहीत असतील तर वाहतूक कोंडी होणार नाही. यासाठी वाहतूक विभाग उपायुक्त यांनी कामांची पाहणी करून संबंधित विभागाला ३१ मेपर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम ४ महिन्यांपूर्वीच देण्यात आले आहे. शहरातील रस्ते चांगले असून पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, असा विश्वास नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता सुरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पावसाळ्यात वाहतूक सुरळीत ठेवण्याचे काम वाहतूक पोलिसांना करावे लागते. पावसाळ्यात रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून विविध विभागांच्या हद्दीतील रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे लेखी पत्र संबंधित विभागांना दिले आहे.  नियोजन करण्यात येत आहे.

-सुनील लोखंडे, उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई

शीव-पनवेल महामार्गावर कॉंक्रीटीकरण सुरू आहे. वाशी गावाजवळ मार्गिका वाढवणे शक्य आहे तिथे वाढवण्यात आले आहेत. अजूनही काही कामे सुरू आहेत. परंतु पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घेत आहोत.

-किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्व.बांधकाम विभाग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 12:40 am

Web Title: keep the roads ready before the monsoon
Next Stories
1 देवगडच्या हापूसचा मोसम संपुष्टात
2 पालिका रुग्णालयांत चार डॉक्टर रुजू
3 शवविच्छेदनासाठी मदतनीस मिळेना!
Just Now!
X