पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज (रविवारी) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून लटकलेला या प्रकल्पाला अखेर मुहूर्त मिळाला. डिसेंबर २०१९ ला या विमानतळावरून पहिले विमान टेकऑफ घेईल, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. अखेर काय आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हे आपण जाणून घेऊयात…

* ११६० हेक्टरवर १६ हजार कोटी रूपये खर्चून हे विमानतळ उभारले जाणार आहे. तीन टप्प्यात याचे काम होईल. पहिला टप्पा २०१९ मध्ये पूर्ण होणार आहे.

dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
pune airport marathi news
पुणे विमानतळाचं नवीन टर्मिनल कधी सुरु होणार? विमानतळाच्या संचालकांनी दिलं उत्तर…
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द
Boeing Investment In India
हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?

* सिडकोने जमिनी संपादन केल्या आहेत. एकूण १२ गावातील ३५०० कुटुंबापैकी सध्या ५०० कुटुंबाचे इतरत्र स्थलांतरण करण्यात आले आहे.

* दोन हजार कोटींचे काम चार कंपन्याना देण्यात आले आहे. यात जीव्हीके इन्फ्रास्ट्रक्चर, गायत्री इन्फ्रा प्रोजेक्ट, जे एम म्हेत्रे, टीजेपीएल या कंपन्यांचा समावेश आहे. यात डोगराचे सपाटीकरण करणे, भराव टाकणे, नदीचा प्रवाह बदलणे, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणे या कामांचा समावेश.