वाशी सेक्टर ६ येथील साहित्य मंदिर सभागृहात प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी यांच्या वतीने रविवारी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अठरावे वार्षिक अधिवेशनांचे उद्घाटन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते सरस्वती वंदन करून दीपप्रज्वलनाने करण्यात आले. या वेळी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथ पुरस्कार मिळणाऱ्या नागेश कुलकर्णी यांचा कुबेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी तीन सत्रांमध्ये एकदिवसीय अधिवेशन मोठय़ा उत्साहात पार पडले.
प्रथम सत्रामध्ये ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ‘वाचन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान देत उपस्थितांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. या वेळी उपस्थितांनी ‘लोकसत्ता’ने केलेल्या मदतीचे कौतुक केले, तर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ग्रंथालय व वाचनालयांसाठी जेवढी काही मदत करता येईल तेवढी पूर्णपणे मदत करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी कोकणातील शंभर वर्षे जुन्या झालेल्या सहा ग्रंथालयांचा सत्कार करण्यात आला, तर सत्कार करण्यात आलेल्या वाचनालयाच्या प्रतिनिधींकडून वाचनालयाचे कथन करण्यात आले. सिंधुदुर्गमधील अनंत शिवाजी देसाई वाचनालयाचे मंगेश मसके, रायगड सार्वजनिक जिल्हा वाचनालय मुरुड, जंजिराचे उदय सबनीस, रत्नागिरी सद्गुरू लोकमान्य वाचनालय देवरुखचे डॉ. वर्षां फाटक, मुंबईचे मुंबई ग्रंथसंग्रहालयाचे सुनील कुबल, ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माया गोखले, कल्याणमधील कल्याण सार्वजनिक वाचनालयांचे राजीव जोशी, मुंबई उपनगरातील ‘नॅशनलचे लायब्ररी’चे प्रमोद महाडिक यांनी कथन केले. वाचनालयांबद्दल माहिती देत असताना काही कटू, तर काही चांगले अनुभव या वेळी ग्रंथालयांच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात येऊन लायब्ररीच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. या उपस्थितींना टाळय़ांच्या प्रतिसादात दाद दिली.
या वेळी शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रंथालय संदर्भातील समस्या सरकारच्या विचाराधीन असल्याचे सांगितले. या वेळी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेंद्र वैती, कार्याध्यक्ष गजानन प्रभू, कार्योपाध्यक्ष प्रमोद खानोलकर, कार्यवाह मंगेश मसके, कोशाध्यक्ष राजन पांचाळ, माणिकराव कीर्तने वाचनालयांचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र नेने, अश्विनी बाचलकर, कार्यवाह माधव ठाकूर, महापौर सुधाकर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई व मुंबई उपनगरातील ग्रंथालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुपारच्या दुसऱ्या सत्रात निनाद प्रधान यांनी ई-बुक्स व ई-गं्रथालये यांची माहिती चित्रफितीद्वारे दिली. ई-बुक्स व ई-गं्रथालयांबद्दल माहिती देत काळाच्या बदलानुसार ग्रंथालयात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला. तिसऱ्या सत्रात शासकीय अधिकारी, साहाय्यक ग्रंथालय संचालक शालिनी हिंगोले, ग्रंथालय अधिकारी अरविंद धोने, मंगल पल्लिक, निरीक्षक गायकवाड यांनी उपस्थितींना सरकारने वेतन श्रेणी द्यावी, जुने झालेले ग्रंथ बाद करण्यास सांगावे तसेच ग्रंथपालाची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकऱ्या उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी सरकारने काय तरी करावे, अशी मागणी करण्यात आली.

More Stories onकोकणKonkan
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan division literature jagar
First published on: 01-03-2016 at 01:53 IST