19 October 2019

News Flash

कोपरखैरणेत झोपडपट्टीत भीषण आग

या भागात अनेक बेकायदा भंगार आणि प्लास्टिकचे गोदाम असून या जमिनीचा काही भाग महापालिका क्षेत्रात तर काही भाग वनखात्याच्या अंतर्गत येतो.

कौपरखैरणेतील सेक्टर १९ मध्ये झोपडपट्टी आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर १९ मधील झोपडपट्टीत बुधवारी सकाळी आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून आगीत दोन सिलिंडरचे स्फोट झाल्याचेही वृत्त आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

कौपरखैरणेतील सेक्टर १९ मध्ये झोपडपट्टी आहे. या भागात अनेक बेकायदा भंगार आणि प्लास्टिकचे गोदाम असून या जमिनीचा काही भाग महापालिका क्षेत्रात तर काही भाग वनखात्याच्या अंतर्गत येतो. या झोपडपट्टी आणि गोदामांवर कारवाई करताना दोन्ही विभाग एकमेकांकडे बोट दाखवतात, अशी तक्रार स्थानिक करतात.

या झोपडपट्टीत बुधवारी सकाळी साडे सातच्या सुमारास भीषण आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आग पूर्णपणे विझवण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

First Published on January 9, 2019 10:47 am

Web Title: koparkhairane fire at slum area in sector 19 no casualties