27 January 2021

News Flash

कोपरखैरणेतील आरोग्य केंद्र बंद

सूचना फलक न लावल्याने नागरिकांची अडचण

बोनकोडे येथील पालिकेच्या आरोग्य केंद्र बंद करण्यात आल्यानंतर प्रवेशद्वारावर त्याविषयाची कोणतीही सूचना लिहिण्यात आलेली नाही.

सूचना फलक न लावल्याने नागरिकांची अडचण

नवी मुंबई : कोपरखैरणेतील नागरिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकामासाठी बंद करण्यात आले आहे, मात्र बंद इमारतीच्या प्रवेशद्वारावर नागरी आरोग्य केंद्र इतरत्र स्थलांतर केल्याबाबत माहिती फलक लावला नसल्याने उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

कोपरखैरणे परिसरासाठी पालिकेचे  बोनकोडे सेक्टर- १२ मध्ये नागरी आरोग्य केंद्र आहे. सध्या या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नवीन बांधकाम काढण्यात आले आहे. त्यामुळे जुने केंद्र बंद करण्यात आले आहे. पावसाळ्यातील साथीच्या आजारांमुळे नागरिक उपचारांसाठी  कोपरखैरणे आणि बोनकोडेतील नागरी आरोग्य केंद्र उपलब्ध होते. बांधकामासाठी ते बंद ठेवण्यात आले असून पालिकेच्या सीबीएसई शाळेत सुरू करण्यात आले आहे. मात्र तेथे कोणताही सूचना फलक लावण्यात आलेला नाही.

याउलट आरोग्य केंद्राचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून आत प्रवेश करू नये, अशी सूचना एका फलकावर लिहिण्यात आली आहे. याबाबत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी दयानंद कटके यांनी माहिती घेऊन फलक लावण्यास सांगण्यात येईल, असे सांगितले.

करोनाकाळात इतर साथीच्या आजारांवर उपचार मिळविण्यासाठी नागरिकांना जून महिन्यांपासून मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच काळात अनेक खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करण्याचा निर्णय घेतला. यात नागरिकांची मोठी अडचण झाली.

त्यामुळे पालिका वा सरकारी दवाखान्यांमध्ये उपचार मिळण्याचीही आशा धुसर झाली आहे. आता काही प्रमाणात इतर साथीच्या आजारांवर उपचार केला जात आहेत. त्यात पालिकेने दवाखाने इतरत्र ठिकाणी हलविताना नागरिकांना किमान कल्पना देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय टळेल आणि त्यांना वेळेत उपचार मिळतील, अशी प्रतिक्रिया बोनकोडे येथील रहिवाशांनी दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 2:38 am

Web Title: koparkhairane health center closed zws 70
Next Stories
1 विमानतळाची जबाबदारी अदाणी समूहाकडे?
2 महापालिकेचे आरोग्य सोडून सर्व काही
3 वापरलेले हातमोजे विकणाऱ्या टोळीचे धागेदोरे बंगळूरु, हरियाणापर्यंत
Just Now!
X