नवी मुंबई स्मार्ट सिटी आहेच; पण तिची वाटचाल अत्याधुनिक शहराच्या दिशेने करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्थात हे ध्येय गाठण्यासाठी गृहसंकुलांमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. आधुनिक सोयीसुविधांचे संकुल आणि त्याला विकसित तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. कोपरखैरणेतील नंदनवन असलेले ‘कृष्णा आर्केड’ याचे उत्तम उदाहरण आहे. अद्ययावत उद्वाहन (लिफ्ट), अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही, महानगर गॅस कनेक्शन अशा विकसित प्रणालीमुळे संकुलाने शहरात ओळख निर्माण केली आहे.

[jwplayer zVOMyVTv]

‘कृष्णा आर्केड’  कोपरखैरणे

कोपरखैरणे सेक्टर-२ ‘अ’ येथील ‘कृष्णा आर्केड’  हे आधुनिक सोयीसुविधांनी नटलेले कुटुंबसंकुलच आहे. या संकुलात अनेक चांगले उपक्रम हाती घेतले जातात. यात २७ सदनिका आणि १२ दुकानांचे गाळे आहेत. २००५ पासून वसलेले हे गृहसंकुल आजही सुस्थितीत आहे. या संकुलाची वेळोवेळी देखभाल केली जाते. नीटनेटकेपणा हे या गृहसंकुलाचे वैशिष्टय़ आहे. संकुलातील ४० टक्के भाडेकरू आणि ६० टक्के घरमालक असे प्रमाण असले तरी प्रत्येकाचा सहभाग आणि सहकार या तत्त्वावर हे संकुल उभे आहे. कुटुंबभावना रहिवाशांमध्ये कायम आहे. प्रत्येकाच्या मताचा आदर राखला गेल्यामुळे कोणत्याही नव्या बदलाचा तितक्याच तातडीने स्वीकार केला जातो.

‘कृष्णा आर्केड’मधील सर्व सदनिकांमध्ये गॅस जोडणी देण्यात आल्या आहेत. संकुलात इंटर टेलिकॉम सिस्टीमची सुविधाही उपलब्ध आहे. नजीकच्या काळात संकुलात रिलायन्सची फायबर ऑप्टिक नेटवर्क बसविण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम खूप उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सवात श्रींची पूजा बांधण्यात येते. या काळात विविध स्पर्धा भरविण्यात येतात. यात नृत्यकला, गायन, रांगोळी, वेशभूषा स्पर्धा घेण्यात येतात. मुलांच्या कलागुणांना देणे हा यामागचा उद्देश असतो. लहान वयातच कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक सदस्य पुढे सरसावत.  संकुलातील प्रत्येक रहिवाशाची काळजी घेण्यात येते. एखाद्याला दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत रहिवासी मदत करतात. त्या व्यक्तीची पुरेपूर काळजी घेण्यासाठी काही जण मदतीला धावतात. यात कोणतीही उणीव भासू दिली जात नाही. रक्ताच्या नात्यापलीकडे माणुसकीचे नाते येथे जपले जाते. एकमेकांबद्दल आपुलकीची भावना मनात तेवत राहो या उद्देशाने तीन महिन्यातून एकदा सामुदायिक भोजन करून संकुलातील कुटुंबाचा उपभोग घेत असतात. येथे गोकुळाष्टमीला खास करून लहानग्यांसाठी विविध खेळ आयोजित करण्यात येतात.  कृष्णलीलांनी सारा संकुल परिसर आनंदून जातो. गोकुळाष्टमीचा खरा उद्देश पूर्ण केला जातो.

कृष्णा आर्केड घणसोली नाल्याच्या जवळच वसलेले आहे. त्यामुळे येथे काही प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव आहे. गृहनिर्माण संस्थेच्या समितीच्या वतीने पालिकेला नाल्यावर बांधकाम करून पार्किंगसाठी जागा उभारण्यासाठीचे वाहनतळ उभारण्याची सूचना करणारे पत्र पालिकेला सोसायटीच्या वतीने देण्यात आले आहे. या उपक्रमातून जागेचा योग्य उपयोग करून शहरातील पार्किंगची समस्या कमी करू शकतो, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

खेळातून सहानुभूती

या संकुलातील प्रत्येक रहिवासी रात्री जेवल्यानंतर एकत्र येऊन बॅडमिंटन, कॅरम आदी खेळ खेळत असतात. खेळता खेळता येथे तरुणाई, महिला वर्ग, ज्येष्ठ उपस्थित राहतात. या संकुलाच्या कामकाजावर, सुविधांवर, उपाय योजनांवर विचार-विनिमय होत असतात आणि त्यातून संकुलाच्या फायद्याचे उपक्रम हाती घेतले जातात. एकमेकांचे दृष्टिकोन ऐकून घेऊन ते अमलात आणले जातात. यातून कट्टय़ावरच्या गप्पा रंगतात आणि त्यातून आम्ही प्रत्येक रहिवाशांप्रति असलेली सहानुभूती जपत असतो, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

सक्षम अग्निशमन यंत्रणा

शासनाच्या नियमानुसार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक संकुलात अग्निशमन यंत्रणा असणे गरजेचे आहे, हे समाजभान जाणून येथील सोसायटी कमिटीच्या सदस्यांनी सक्षम अशी अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित केली आहे. असे एकूण ७ अग्निरोधक गॅस सिलिंडर प्रत्येक मजल्यावर बसविले आहेत. येथे गॅस कनेक्शन अनेक ब्रॉडबँड सुविधा असल्यामुळे कोणताही धोका उद्भवू शकतो. हे टाळण्यासाठी अशी अग्निशमन यंत्रणा बसविणे गरजेचे असल्याचे कमिटीच्या सदस्यांनी सांगितले आहे.

[jwplayer y8Pn2zMM]