15 July 2020

News Flash

कर्नाटकात प्रवेश न मिळाल्याने मजूर परतले

दोन राज्यांमधील प्रशासनात समन्वय नसल्याने या मजुरांना मनस्ताप सहन करावा लागला.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबईतून कर्नाटकात एसटी बसने गेलेल्या दोनशे मजुरांना कर्नाटक सरकारने प्रवेश न दिल्याने त्यांना परत नवी मुंबईत परतावे लागले. दोन राज्यांमधील प्रशासनात समन्वय नसल्याने या मजुरांना मनस्ताप सहन करावा लागला.

नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यात टाळेबंदीत दोन महिन्यांपासून हाताला काम नसल्याने मजुरांची उपासमार सुरू होती. त्यामुळे परप्रांतीय मजुरांनी आपल्या मूळ गावी जाण्याचा मार्ग पत्करला आहे. यासाठी सरकारने रेल्वे व एसटी बसची व्यवस्था केली आहे.

नवी मुंबईत बिगारी, गवंडी काम करणाऱ्या सुमारे २०० मजुरांनी कर्नाटकातील बिदर गुलबर्गा येथे जाण्यासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ९ बसमधून हे दोनशे मजूर २२ मे रोजी सानपाडा भागातून निघाले. त्यांना कर्नाटकातील बिदर येथे सोडण्यात येणार होते. या एसटी बस पुण्यात गेल्यानंतर त्यांना बार्शी तुळजापूरऐवजी बेळगावमार्गे पुढील प्रवास करावा लागला. गावी जाणार म्हणून हे मजूर आनंदात होते. मात्र बेळगाव येथे पाहोचल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरझण पडले. कर्नाटक सीमेवर कर्नाटक प्रशासनाने त्यांना प्रवेश देण्यास मनाई केली. या ठिकाणी या बस अडविण्यात आल्या. या ठिकाणहून या मजुरांचे मूळ गाव दूर असल्याने त्यांना पुढील प्रवास कसा करायचा हा प्रश्न पडला. एवढय़ा दूरवर प्रवास करूनही ते अडकून पडले होते.

बारा तास तेथे ताटकळत बसावे लागले. अखेर प्रवाशांनी परत सानपाडा येथे सोडण्याचा आग्रह धरल्यानंतर त्यांना परत नवी मुंबईत सोडण्यात आले.

आम्ही २२ मे रोजी नवी मुंबईतून निघालो होतो. २३ मे रोजी या ठिकाणी पोहोचलो.आमच्याकडे पास असूनही कर्नाटक सरकारने प्रवेश दिला नाही. शेवटी पुन्हा आम्ही आलेल्या एसटी बसमधून नवी मुंबईत परतलो. या प्रकारामुळे आम्हाला  प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला.

– प्रल्हाद गायकवाड, प्रवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:22 am

Web Title: laborers gone to karnataka by st bus return to navi mumbai zws 70
Next Stories
1 अखेर खाडीपुलावर प्रकाशव्यवस्था
2 ‘एपीएमसी’ आवारात सुरक्षारक्षकाचा आकस्मिक मृत्यू
3 सतत उभे राहून माथेरानमधील घोडे आजारी
Just Now!
X