News Flash

मनपा करोना काळजी केंद्रात पाण्याचा अभाव

तुर्भे सेक्टर २४ येथे राधासत्संग केंद्रात करोना काळजी केंद्र निर्माण करण्यात आले आहे.

नवी मुंबई : मनपा क्षेत्रातील करोना रुग्णालय आणि काळजी केंद्राचे कौतुक राज्यभर होत असताना आता मात्र ही केंद्रे समस्यांनी ग्रस्त झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. तुर्भे येथील राधा सत्संग काळजी केंद्रात पाण्याची समस्या दोन दिवसांपासून सुरू आहे. जे आहे ते पाणी जपून वापरावे लागत असून शौचालय, स्नानगृहात झालेल्या अस्वच्छतेने खास करून महिलांची कुचंबणा होत आहे.

तुर्भे करोना काळजी केंद्रात अचानक जलपुरवठा करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने पाण्याअभावी रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे समोर आले आहे. तुर्भे सेक्टर २४ येथे राधासत्संग केंद्रात करोना काळजी केंद्र निर्माण करण्यात आले आहे.

या केंद्रात ३८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपासून या केंद्रात पाणीपुरवठा अपुरा होत आहे. तर शुक्रवारी सकाळी जल पुरवठा करण्यासाठीची मोटर नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला. या केंद्रातील सात क्रमांकाच्या उपचार केंद्रातील मोटार खराब झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. त्यामुळे ही समस्या उद्भवल्याने रुग्णांना नैसर्गिक विधी, स्नान करण्यास पाण्याअभावी वंचित राहावे लागले.हात धुण्यासाठी बाटलीबंद पाण्याचा वापर करावा लागला.

प्रशासनाने मोटर शुक्रवारी सकाळी बंद नादुरुस्त झाल्याचा दावा केला आहे. मात्र रुग्णांच्या नातलगांनी गुरुवारी रात्रीच ही समस्या उद्भवल्याचा आरोप केला आहे. करोना काळजी केंद्रातील तांत्रिक समस्या वाढल्याची तक्रार वारंवार रुग्ण करीत असून मनपा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी देखील करोना काळजी केंद्रातील समस्यांकडे आयुक्त अभिजित बांगर यांचे लक्ष वेधले आहे.

सकाळी १० वाजता ७ क्रमांकाच्या करोना काजळी केंद्रात पाणीपुरवठा करणारी मोटार नादुरुस्त झाली होती. दुपारी दोनपर्यंत दुरुस्ती करण्यात आली आहे. दरम्यान पाणी समस्या निर्माण होऊ नये म्हणून बाहेरून पाणी आणण्यात आले. सद्यस्थितीत पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. – सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:01 am

Web Title: lack of water in municipal corona care center akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 एक हजार पोलीस रस्त्यावर
2 लसीकरण आज पूर्णत: बंद
3 संचारबंदीनंतरही पनवेलमध्ये रुग्णवाढ
Just Now!
X