श्रीमंत अशील पाहून वकिलानेच त्याचे अपहरण करून ३ कोटींची खंडणी मागणाऱ्या वकिलास खारघर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्याच्या अन्य तीन ते चार साथीदारांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विमल झा. फिर्यादी नवनाथ गोळे यांचा शिपिंगचा व्यवसाय आहे. एका खटल्यात आरोपी झा आणि गोळे यांची ओळख झाली होती. गोळे यांचा मोठा व्यवसाय पाहून मीच तुमचे सर्व काम पाहतो म्हणून झा ने गोळे यांच्याकडे तगादा लावला. मात्र त्याला गोळे यांनी थारा दिला नाही. याचा मनात राग ठेवत झा यांनी त्याच्या तीन साथीदारांच्या मदतीने गोळे यांच्यावर नजर ठेवली. गोळे किती वाजाता कार्यालयात येतात, जातात, अन्य कोठे कोठे जातात यावर पाळत ठेवली. २ एप्रिल रोजी गोळे यांना सीबीडी येथे काही महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणून बळजबरीने बोलावले. खूपच आग्रह करत असल्याने गोळे तेथे गेलेही मात्र त्याच वेळेस गोळे यांचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यावर त्यांना कर्जतनंतर कल्याण रोडमार्गे मुरबाड आणि त्यानंतर माळशेज घाट गाठत आळे फाटामार्गे नाशिकला एका फार्म हाऊसवर बंद खोलीत ठेवले होते. हे करत असताना गोळे यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असायची तसेच गोळे यांना ३ कोटी रुपये देण्यातही तगादा लावण्यात आला. मात्र तरीही गोळे तयार न झाल्याने त्यांना अनेकदा मारहाण करण्यात आली.