15 December 2017

News Flash

पैसा कसा करायचा ‘मोठा’?

या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.

प्रतिनिधी, नवी मुंबई | Updated: August 5, 2017 1:13 AM

प्रतिनिधिक छायाचित्र

‘लोकसत्ता अर्थसल्ला’मध्ये उद्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीची पाठशाळा

सोने तसेच स्थावर मालमत्तेतून मिळणारा अल्प परतावा, स्थिर उत्पन्न देणाऱ्या पर्यायातील घसरते लाभ अशा स्थितीत वरच्या टप्प्यानजीक असलेला भांडवली बाजार आणि त्याच्याशी संबंधित म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत काय निर्णय घ्यावा याचे मार्गदर्शन येत्या रविवारी गुंतवणुकदारांना करण्यात येणार आहे. ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ ही गुंतवणूक मार्गदर्शन कार्यक्रम नवी मुंबईत वाशी येथे होणार आहे.

‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा कार्यक्रम येत्या रविवारी, ६ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता वाशी येथे होणार आहे. मराठी साहित्य संस्कृती कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६ येथे तज्ज्ञ मार्गदर्शक आर्थिक नियोजन व गुंतवणुकीबाबतचे धोरण स्पष्ट करतील. या कार्यक्रमासाठी प्रवेश खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य आहे.

अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे गुंतवणुकीतून आर्थिक नियोजन कसे साध्य करावे याबाबतचा मूलमंत्र यावेळी देतील. गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांबरोबरच नव्या पर्यायांची ओळख, त्यांची वैशिष्टय़े, त्यातून मिळणारा परतावा, करविषयक तरतुदी आदींबाबत जोशी यावेळी सांगतील.

 

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या लोकप्रिय गुंतवणूक माध्यमाद्वारे तुलनेने अधिक परतावा मिळण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याबाबत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे

सोदाहरणासह मार्गदर्शन करतील. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचा मेळ साधून गुंतवणूक, जोखीम आणि परतावा आदींबाबतचा उहापोह ते यावेळी करतील.

First Published on August 5, 2017 1:13 am

Web Title: loksatta arth salla mutual fund