वाशीत शनिवारी ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’ जागर!
पैसा कुठे गुंतविला तर ठरविलेली स्वप्ने साकार होतील; गुंतलेला पैसा सुरक्षित राहील आणि चांगल्या परताव्यासह तो वाढतही जाईल, अशा गुंतवणुकीचे मार्ग कोणते?असे प्रश्न महिन्याकाठी थोडीथोडकी बचत राखणाऱ्या सर्वापुढेच आहेत. या प्रश्नांच्या अनुषंगाने मार्गदर्शनपर ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रमातून येत्या शनिवारी वाशीमध्ये गुंतवणूकदारांशी संवाद साधला जाणार आहे.
पैशाला चांगल्या गुंतवणुकीचे वळण देणारा ‘रिलायन्स म्युच्युअल फंड’ प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’चा गुंतवणूक जागर शनिवारी, ३० जुलै रोजी मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर-६, वाशी येथे सायंकाळी ६.०० वाजता मांडला जाणार आहे. ‘अर्थ नियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयावर आर्थिक नियोजनकार मिलिंद अंध्रुटकर, तर ‘म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे फायदे’ या विषयावर गुंतवणूकविषयकसल्लागार आणि ‘अर्थ वृत्तान्त’चे स्तंभ लेखक वसंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन यानिमित्ताने उपस्थितांना होईल. निश्चित केलेले अर्थलक्ष्य गाठून देणारे योग्य म्युच्युअल फंड, त्यातील जोखमेबरोबरच परताव्याचे प्रमाण, फंडांची निवड करण्याचे निकष आणि काळजी, बरोबरीनेच करबचतीचे समाधान कसे होईल, याबाबत कुलकर्णी हे विवेचन करतील. तर घर-गाडी बाळगण्याचे स्वप्न चाळिशीपूर्वीच साकारण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यातील बचतीचे महत्त्व विशद करताना, पैशाने पैसा वाढवत नेण्याच्या मार्गाचा अंध्रुटकर आपल्या मार्गदर्शनातून वेध घेतील.
सोप्या भाषेत, सुबोध उदाहरणांसह, तज्ज्ञांकडून या उपक्रमांतून दिले जाणारे मार्गदर्शन उपस्थितांना निश्चितच उपयुक्त ठरेल. शिवाय आपले नेमके प्रश्न त्यांना तज्ज्ञांना विचारण्याची संधीही मिळेल. कार्यक्रमाला प्रवेश खुला व विनामूल्य आहे.

केव्हा, कुठे?
शनिवारी, ३० जुलै २०१६
सायंकाळी ६.०० वा.
स्थळ : मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर-६, वाशी, नवी मुंबई</p>

तज्ज्ञ मार्गदर्शक :
मिलिंद अंध्रुटकर आणि
वसंत कुलकर्णी
Mutual fund investments are subject to market risk. Please read the offer documents carefully before investing.