News Flash

धर्माधिकारी कलासंकुलात चोरी

पंखे चोरीला, पालिकेची ढिसाळ सुरक्षाव्यवस्था

पंखे चोरीला, पालिकेची ढिसाळ सुरक्षाव्यवस्था

शिरवणे सेक्टर १मधील महाराष्ट्रभूषण श्री नानासाहेब धर्माधिकारी कलासंकुलामध्ये मंगळवारी चोरी झाली. वास्तूच्या पहिल्या मजल्यावर पालिकेने टाऊन लायब्ररीला जागा दिली आहे. तिथून चोरटय़ांनी १५ खुच्र्या आणि आठ पंखे चोरले. कला संकुलाच्या मागील बाजूच्या काचा फोडून चोर आत घुसल्याचे कळते. त्यामुळे वास्तूची सुरक्षाव्यवस्था ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वास्तूत टाऊन लायब्ररीची २८ हजार पुस्तके व झेरॉक्स यंत्र आहे. पंखे, खुच्र्या असे सामान या कला संकुलात ठेवण्यात आले आहे. तळमजल्यावर एका खोलीत पालिकेचे साफसफाई कर्मचारी हजेरी लावतात. साफसफाई ठेकेदाराच्या कामगारांनाही याच इमारतीतील तळमजल्यावर जागा देण्यात आली होती. तिथेच कचऱ्याचे अनेक डबे ठेवले होते.

वास्तूच्या अस्वच्छतेवर ‘लोकसत्ता’ने काही दिवसांपूर्वी प्रकाश टाकला होता. संकुलात पत्ते, साफसफाई कर्माचाऱ्यांचे गणवेश इतस्तत: पडून असत. ही बाब विभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच कलासंकुल स्वच्छ करण्यात आले होते.

मंगळवारी रात्री या ठिकाणी चोरी करण्यात आली आहे. पंखे व खुच्र्या पळवून नेल्या जात असताना सुरक्षा कर्मचारी काय करत होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पालिका उपायुक्त व विभाग अधिकाऱ्यांना विचारले असता सुरक्षारक्षक नेमल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे चोरी झाली तेव्हा सुरक्षारक्षक कुठे होते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वास्तूच्या पहिल्या मजल्यावर टाऊन लायब्ररीची २८ हजार पुस्तके व पंखे-खुच्र्या आहेत. चोरटय़ांनी दरवाजा तोडून खुच्र्याची नासधूस केली. खुच्र्या आणि आठ पंखे चोरले. पालिकेला माहिती देण्यात आली आहे.    – विजय केदारे, सचिव टाऊन लायब्ररी, वाशी

शिरवणे येथील कला संकुलात चोरी झाल्याबाबत विभाग अधिकाऱ्यांकडून योग्य ती माहिती घेण्यात येईल. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था होती. तरीही चोरी का झाली, याची सखोल चौकशी करण्यात येईल. – दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त, परिमंडळ १

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 12:08 am

Web Title: loksatta crime news 51
Next Stories
1 ‘ऐरोली-काटई उन्नत’ मार्गी
2 ऐन उकाडय़ात वीज ‘कोसळली’!
3 सीवूड्समध्ये विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू
Just Now!
X