करिअर निवडीचा नेमका निकष कोणता, हे जाणून घेण्यासाठी दहावी-बारावीचे विद्यार्थी कमालीचे उत्सुक असतात. त्यासोबतच दहावी-बारावीनंतर नेमका कुठला अभ्यासक्रम निवडावा आणि त्या अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप काय आहे आणि त्यातील विविध करिअरसंधी कोणत्या.. अशा प्रश्नांनी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात ठाण मांडलेले असते. अशा करिअरविषयक अनेक प्रश्नांची अचूक उत्तरे तुम्हाला शनिवार, १२ डिसेंबर रोजी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या परिसंवादात नक्कीच गवसतील. हा परिसंवाद सर्वासाठी खुला आहे.
एसआरएम युनिव्हर्सिटी प्रस्तुत आणि रोबोमेट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा परिसंवाद शनिवारी, सायंकाळी पाच वाजता वाशीच्या सेक्टर ६ येथील मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला करिअर समुपदेशक विवेक वेलणकर दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख करून देणार आहेत. त्यानंतर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांचे ‘वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..’ या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात माटुंग्याच्या व्हीजेटीआय महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक (निवृत्त) सुरेश नाखरे श्रोत्यांना अभियांत्रिकी शाखेतील विविध संधींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादाच्या अखेरीस ‘दहावी-बारावीच्या परीक्षांना सामोरे जाताना येणाऱ्या तणावाचा सामना कसा करावा?’ याविषयी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी विद्यार्थी-पालकांशी संवाद साधतील.
* कधी ? – शनिवार, १२ डिसेंबर रोजी सायं. ५ वाजता
* कुठे? मराठी साहित्य संस्कृती कला मंडळाचे सभागृह, सेक्टर ६, वाशी.

मार्गदर्शक व त्यांचे विषय –
* वैद्यक क्षेत्रात करिअर घडविताना..- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.
* अभियांत्रिकी शाखेतील संधी- प्रा. सुरेश नाखरे, प्राध्यापक (निवृत्त), व्हीजेटीआय महाविद्यालय, माटुंगा.
* दहावी-बारावीनंतर विविध विद्याशाखांतील अभ्यासक्रमांच्या पर्यायांची ओळख- विवेक वेलणकर, करिअर समुपदेशक.
* परीक्षेच्या तणावाचा सामना कसा कराल?- डॉ. हरीश शेट्टी, मानसोपचारतज्ज्ञ.