24 September 2020

News Flash

खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट सुरूच

वाढीव देयकांबाबत दक्षता पथकाची मागणी

(संग्रहित छायाचित्र)

वाढीव देयकांबाबत दक्षता पथकाची मागणी

नवी मुंबई : मुंबई व नवी मुंबईतील एकूण पंधरा ते वीस खाजगी रुग्णालयांना अनुक्रमे ३४ व ३२ लाख रुपये करोनाबाधित रुग्णांना परत करण्याची नामुष्की ओढवली आहे. असे असतानाही नवी मुंबईतील काही खासगी रुग्णालयांकडून करोना रुणांची आर्थिक लूट सुरूच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका या वाढीव देयकांची चौकशी करून रुग्णांना वाढीव पैसे परत देणार आहे.

नवी मुंबईत अपोलो, फोर्टीज, रिलायन्स, एम जी एम, अशी पंधरा ते वीस छोटी-मोठी रुग्णालये आहेत. करोना रुग्णांवर ठोस अशी उपचारपद्धत नाही तरीही प्राणवायू पातळी कमी झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याचे दिसून येते. बहुतांशी रुग्णांचे मेडिक्लेम असल्याने खाजगी रुग्णालयात उपचार करण्याकडे जास्त कल आहे. त्यामुळे रुग्णाला दाखल करतानाच खासगी रुग्णालये २० हजारांपासून दोन लाखपर्यंत अनामत रकमेची मागणी करीत आहेत. या उपचारांदरम्यान एकतर रुग्ण बरा होऊन घरी जात आहे किंवा त्याचा मृत्यू होत आहे. या दोन्ही परिस्थितीत खासगी रुग्णालये भरमसाट देयके आकारात आहेत. हा आकडा १८ लाखापर्यंत पोहचला आहे. रुग्णांची ही होणारी लूट मनसेने उघड केली. देयके कमी न झाल्यास पालिका अधिकाऱ्यांना रुग्णालयांचे तारणहार हा पुरस्कार देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मागील सात दिवसात जादा बिलाच्या तक्रारींची पालिकेने चौकशी करून ३२ लाख रुपये करोनबाधित रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यास भाग पाडले. अजूनही रुग्णांची लूट सुरू असल्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

नातेवाईकांकडून लेखी

काही खासगी रुग्णालयांनी नवीन शक्कल लढवली असून रुग्णाला दाखल करून घेतानाच नातेवाईकांकडून लिहून घेतले जात आहे. यात रुग्णालयाविषयी कुठेही तक्रार करणार नसल्याचे लेखी घेतले जात आहे. त्यामुळे पालिकेने या खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी दक्षता पथक नेमण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:59 am

Web Title: looting of patients from private hospitals continues zws 70
Next Stories
1 पालिकेतील ६० ‘करोनायोद्धे’ करोनाग्रस्त
2 तोतया नौदल अधिकाऱ्याला अटक
3 नवी मुंबईत करोना नियमांना हरताळ
Just Now!
X