मालवाहतुकीवर निर्बंध घातल्याने आवक कमी

नवी मुंबई</strong> : करोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढलेली असताना एपीएमसीतील धान्यबाजारातील उलाढाल मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. धान्यमालाच्या वाहतुकीवर एपीएमसीत निर्बंध घातल्याने आवक कमी झाली असून गेल्या वर्षीपेक्षा ती निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे दरातही वाढ झाली आहे.

एपीएमसी बाजार आवारात मार्च ते एप्रिल दरम्यान नवीन शेतमालाची आवक सुरू होते. यंदा गत वर्षीच्या तुलनेत धान्याची आवक घटली आहे. टाळेबंदीत वाहतुकीवर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर अवकाळी पावसाने मोठय़ा प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. मार्च ते सप्टेंबर या कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत धान्याची आवक आणि विक्री ही दुपट्टीने घटली आहे. मे महिन्यात तर तिप्पटने घट झाल्याचे पहावयास मिळत आहे. मे २०१९ मध्ये १२ लाख क्विंटलहून अधिक आवक झाली होती. यंदा फक्त ४ लाख क्विंटल आवक झाली आहे.

दरात वाढ

एपीएमसी घाऊक बाजारात प्रतिक्विंटल मागे १ हजार ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. तर चणाडाळ, मसूरच्या दरात ४०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. गहू व तांदूळचे सरासरी दर मात्र कमी झालेले दिसत आहेत.

प्रतिक्विंटलचे दर

शेतीमालाचे नाव                २०१९         २०२०

गहू                                २६००            २०००

तांदूळ                           ४०००             ३८००

चनाडाळ                      ६०००              ६५००

मसूरडाळ                     ५४००               ६४००

मूगडाळ                        ९०००             १०,०००

तूरडाळ                        ८५००              ९५००

उडीदडाळ                     ७५००              ९०००

२१  मार्च ते ३० सप्टेंबर २०१९

८,१८,२२,७२७  आवक

५३,९२,६९७    जावक

२१ मार्च  ते ३० सप्टेंबर २०२० : 

३८,६८,९३१ आवक

३४,२९,७१६  जावक