News Flash

बाजारात उलटय़ा, मॅजिक छत्र्यांची जादू

गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये प्रतिनग उपलब्ध असणारी उलटी छत्री यंदा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्याने ४५० ते ५०० रुपयांवर आली आहे.

 

पूनम धनावडे, नवी मुंबई

४०० ते ५०० रुपयांना, तर साध्या छत्र्या २०० ते ६०० रुपयांदरम्यान उपलब्ध

पावसाळा सुरू होताच छत्र्या, रेनकोट खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली असून यंदा उलटी छत्री, मॅजिक छत्री आणि टेन्ट छत्री या छत्र्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाशीतील होलसेल बाजारात या छत्र्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. रेनकोटमध्ये मात्र फार नावीन्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये प्रतिनग उपलब्ध असणारी उलटी छत्री यंदा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्याने ४५० ते ५०० रुपयांवर आली आहे. टेंट छत्री तंबूच्या आकाराची आहे. मॅजिक छत्री ही पूर्ण कोरी आणि एकाच रंगात असते, मात्र त्यावर पाणी पडताच रंगीत फुले दिसू लागतात. अशी जादू दाखवणारी ही छत्री मॅजिक छत्री म्हणून ओळखली जात असून, ती ४००ते ५०० रुपयांना उपलब्ध आहेत.

गतवर्षी बाजारात रंग बदलणाऱ्या, मोदक, कपल, थ्री फोल्ड, फ्रिल अशा विविध प्रकारच्या छत्र्या दाखल झाल्या होत्या. रंग बदलणारी  छत्री ५५० ते ७५० रुपये तर मोदक ५५० ते ६५०रुपये, थ्री फोल्ड २०० ते ३५० रुपये तर फ्रिल छत्री ३८० रुपयांना उपलब्ध होती.  पुरुषांच्या साध्या छत्र्या १८० ते ५५० रुपये तर महिलांच्या साध्या छत्र्या १८० ते ६५० रुपयांना उपलब्ध आहेत. कार्टूनची प्रिंट असलेल्या छत्र्या आणि रेनकोट लहान मुलांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. डोरेमॉन, स्पायडर मॅन, बेन टेन, नोबिताच्या रेनकोट्सचे आकर्षण असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. रेनकोट ४५० ते १६०० रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहेत.

अशी आहे उलटी छत्री..

उलटय़ा छत्रीची रचना इतर छत्र्यांपेक्षा थोडी वेगळी आहे. ती मागच्या बाजूने उघडली जाते. मागच्या बाजूला वरती छत्रीचा दांडा असून उघडण्यासाठी बटन लावण्यात आले आहे. हे बटन प्रेस करताच छत्री उलटय़ा बाजूने उघडते. मात्र या छत्रीमध्ये कापडाचे दोन थर आहेत. छत्री उघडताच तिची बाहेरील बाजू आत व आतील बाजू बाहेर जाते. पावसाळ्यात ओलीचिंब झालेली ही छत्री बंद केल्यास ओली बाजू आतमध्ये जाते, त्यामुळे ही छत्री हाताळण्यात कोणतीच अडचण येत नाही. ही छत्री उभीदेखील ठेवता येते. सोसाटय़ाच्या वाऱ्यातही ही छत्री उलटी होणार नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आतमधल्या कापडाला विविध फुलांच्या आकारांची छिद्रे ठेवण्यात आली आहेत. या छिद्रांमुळे छत्रीवर हवेचा दाब आतून-बाहेरून समान राहील.

यंदा बाजारात उलटय़ा दिशेने उघडणाऱ्या छत्रीला ग्राहक अधिक पसंती देत आहेत. ही छत्री विविध प्रकारे उपयुक्त आहे. या छत्रीची छायाचित्रे ऑनलाइन फोटो पाहून तिच्या उपलब्धतेविषयी विचारणा करतात. या छत्रीची दिवसाला २० ते २५ नग विक्री होते.

प्रवीण आहेर, होलसेल विक्रेता, वाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 1:23 am

Web Title: magic umbrella in market
Next Stories
1 दिवाबत्ती वाऱ्यावर
2 आतिवृष्टीला तोंड देण्यास सज्ज
3 नव्या कोऱ्या सीवूड्स रेल्वे स्थानकात गळती
Just Now!
X