News Flash

तळोजात ७० टन इंधनसाठा खाक

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

पनवेल : तळोजा औद्यागिक वसाहतीतील ‘एजिओक्रिस्ट’ कंपनीत आग लागून साठा केलेले ७० टन इंधन खाक झाले तर कंपनीचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

सिडको, तळोजा औद्योगिक विकास महामंडळाचे अकरा अग्निशमन बंब ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र सायंकाळपर्यंत आग धुमसतच होती.  या आगीची झळ शेजारील कारखान्यांनाही बसण्याची शक्यता पाहता नजीकच्या कंपनीतील कामगारांनी कंपनीबाहेर जात सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे जवान सायंकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत होते. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. मात्र यात साठा केलेले सुमारे ७० टन इंधन जळून गेल्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:28 am

Web Title: major fire breaks out at a chemical unit in taloja zws 70
Next Stories
1 ठेकेदारांना वारंवार मुदतवाढ
2 सिडकोकडून ग्रामदेवतांचीही पुनर्स्थापना
3 पक्ष्यांचे खारघर
Just Now!
X