21 September 2020

News Flash

नवी मुंबईतील मॉल सज्ज; बुधवारपासून लगबग वाढणार

अंतराच्या नियमांसह ग्राहकांच्या खबरदारीसाठी विविध उपाययोजना

अंतराच्या नियमांसह ग्राहकांच्या खबरदारीसाठी विविध उपाययोजना

नवी मुंबई : मिशन बिगिन अगेन अंतर्गत बुधवारपासून शहरातील मॉल सुरु होणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जवळजवळ सोडचार महिन्यानंतर मॉलचे शहर असलेल्या नवी मुंबईत लगबग वाढणार असून मॉल व्यवस्थापनानेही सामाजिक अंतराचे नियम पाळण्याबरोबरच ग्राहकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव यामुळे शहरातील मॉल व इतर व्यवहार मार्चच्या मध्यापासून ठप्प झाले. करोनाची वाढती संख्या पाहता संपूर्ण देशात पंतप्रधान मोदी यांनी पहिली टाळेबंदी घोषित केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने ती पुढे वाढत गेली. त्यामुळे लाखोंचे रोजगार गेले, तर व्यापार धोक्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत टप्प्याटप्प्याने पुन्हा व्यवहार हळुहळू सुरू करण्यात आले आहेत. बुधवारपासून मॉल सुरु करण्यात येत आहेत. सीवूड्स रेल्वेस्थानक परिसरात असलेला ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल, वाशी येथील रघुलीला, इनॉॅर्बिट तसेच विविध मॉल यामुळे शहरात मॉलकडे नागरिक मोठय़ा प्रमाणात आकर्षित झाले आहेत. तर अनेकांना विंडो शॉपिंगची मौज घेता येते. त्यामुळे नागरिकांमध्येही विशेष युवावर्गात मॉल कधी सुरू होणार याबाबत उत्सुकता होती. मॉल सुरु झाल्यानंतर मात्र तेथे होणारी गर्दी अंतराच्या नियमांचा फज्जा उडू नये, यासाठी मॉल व्यवस्थापनानेही विविध उपाययोजना केल्याचे निदर्शनास आले आहे. सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल येथेही विविध उपाययोजना करण्यात आल्या असून मॉलमधील प्रवेशद्वारापासून ते ग्राहक बाहेर पडेपर्यंत सोशल डिस्टन्सिंग राखण्याबाबतची खबरदारी घेण्यात आल्याचे दिसत आहे. प्रवेशद्वारावर जंतुनाशकांची व्यवस्था, तसेच प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तपासणी, लिफ्टमध्ये  चौघांनाच प्रवेश, प्रसाधनगृह तसेच वाहनतळ व्यवस्था असेल.

बुधवारपासून मॉल सुरु करण्यात येणार असल्याने मॉलमध्ये पूर्ण निर्जंतुकीकरण करून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अंतराच्या नियमाचे व्यवस्थापनाने योग्य खबरदारी घेतले आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे. मॉलमधील दुकाने ११ ते ७ पर्यंत सुरू राहतील आणि बिग बझार १० ते ७ पर्यंत सुरू ठेवण्यात येतील .

अनिष नायर, मॉल व्यवस्थापन,सीवूड्स ग्रॅन्ड सेन्ट्रल मॉल

वाशी, रघुलीला मॉलमध्येही योग्य ते नियम पाळून व्यवहार सुरू करण्यात येत आहेत.नागरीकांनीही योग्य ते सहकार्य करावे. अंतराच्या नियमांचे पालन करावे.सकाळी ९ ते ७ पर्यंत मॉल सुरु ठेवण्यात येणार आहे.

 -संदीप देशमुख, रघुलीला मॉल व्यवस्थापन वाशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 2:33 am

Web Title: mall ready to re open in navi mumbai zws 70
Next Stories
1 ऑनलाइन मनस्ताप
2 सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी द्या
3 महिलांमध्ये करोनाबाधा कमी
Just Now!
X