15 July 2020

News Flash

रुग्णांसह योद्धय़ांचीही काळजी

८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे खासगी रुग्णालयांना निर्देश

प्रतिनिधिक छायाचित्र

८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे खासगी रुग्णालयांना निर्देश; कर्मचाऱ्यांसाठी सुविधा पुरविण्यासाठी याचिका

नवी मुंबई/पनवेल : बाधितांवरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांत ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे निर्देश पालिकेच्या वतीने देण्यात आले आहेत. तर  करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेलमधून मुंबई आणि नवी मुंबईत जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्याच्या मागणीवर सरकारने कार्यवाही न केल्याने भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

करोनायोद्धय़ांची त्यांच्या कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात राहण्याची व्यवस्था करण्याविषयी आदेश देण्याची मागणी या याचिकेत ठाकूर यांनी केली आहे. महिनाभरापूर्वी ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली होती. ती पूर्ण न केल्यास आंदोलनाचाही इशारा दिला होता.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २१ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नवी मुंबई शहरातील खासगी रुग्णालयात एकूण वापरातील खाटांच्या ८० टक्के इतक्या खाटा करोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने आरक्षित करण्याबाबत निर्देश पालिकेने दिले आहेत.

खासगी रुग्णालयातील कार्यरत डॉक्टर आणि परिचारिका आणि कक्ष परिचर आणि आया  यांना रुग्णालयातील करोनाबाधितांच्या उपचार करायचे आहेत. त्याला डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी नकार दिल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. या सर्वाना कामावर हजर राहणे बंधनकारक आहे. यात कसूर करणाऱ्यांवर मेस्माअंतर्गत  कारवाईचा इशारा पालिका आयुक्तांनी  दिला.

स्वतंत्र रुग्णवाहिकांचे नियोजन

करोनाबाधितांवरील उपचारांशिवाय इतर रुग्णांसाठी, गर्भवती, माता आणि नवजात बालकांना  पुरेशा प्रमाणात रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. कोविडव्यतिरिक्त रुग्णांसाठीही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.कोविड-१९ बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र वाहिका, करोना रुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती आणि करोना संशयितांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका अशी संरचना करण्यात आली आहे. कोविड-१९ साठी रुग्णवाहिका कार्यरत असेल. इतर आजारांच्या रुग्णांचीही काळजी घेत त्यांच्यासाठी सहा रुग्णवाहिका याशिवाय प्रसूतीसाठी प्रत्येक रुग्णालयास १ याप्रमाणे ३ आणि परिमंडळ एक आणि दोनसाठी २ अशा एकूण पाच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बसगाडय़ांचे रूपांतर रुग्णवाहिकेत

नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमातील आठ एनएमएमटीच्या बसगाडय़ांचे रुग्णवाहिकांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. आणखी १० बसगाडय़ा तशा स्वरूपात कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली. आमदारांच्या स्थानिक विकास निधीमधून ३ रुग्णवाहिका देण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. या रुग्णवाहिकांचे नियोजन नीट पद्धतीने होण्यासाठी अद्ययावत जीपीएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 3:23 am

Web Title: mbmc instructions to private hospitals to reserve 80 per cent beds zws 70
Next Stories
1 टाळेबंदी काळातील विलंब शुल्क सर्व हप्ते सुरळीत भरल्यास माफ
2 वाशी एपीएमसीकडे किरकोळ विक्रेत्यांची पाठ
3 ‘सॅनिटायझर’मुळे आता त्वचारोगांची समस्या
Just Now!
X