29 November 2020

News Flash

एपीएमसीतील १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी

केंद्रीय आरोग्य पथकाने एपीएमसीला भेट देऊन कांदा बटाटा बाजारात पाहणी केली

नवी मुंबईतील करोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या एपीएमसीमधील सर्वाची करोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

नवी मुंबईतील एकूण करोना रुग्णांत एपीएमसी मार्केटमधील अनेकांचा समावेश असल्याचे आढळून आल्याने ११ ते १७ मे असा एक आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंद दरम्यान बाजार समितीतील सर्वाची टप्प्याटप्प्याने वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. तसेच बाजार आवारात निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार आज कांदा बटाटा बाजारातील ४०३, धान्य बाजारातील १०२५ आणि मसाला बाजारातील २९५ अशा एकूण १७२३ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कांदा बटाटा बाजारातील ५ व मसाला बाजारातील एक संशयित रुग्ण असून त्यातील ५ जणांची करोना चाचणी करण्यात आली.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य पथकाने एपीएमसीला भेट देऊन कांदा बटाटा बाजारात पाहणी केली आणि त्या ठिकाणी सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीचा तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 12:16 am

Web Title: medical examination of 1723 persons in apmc abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईतून बाहेर जाणारे दहा हजार, येणारे केवळ ४३ जण
2 नव्या सदनिकाधारकांना सोसायटी प्रवेशास मान्यता
3 हापूसच्या दीड लाख पेटय़ा थेट ग्राहकांच्या घरात
Just Now!
X