News Flash

विमानतळ नामकरण आंदोलनासाठी बैठका

विमानतळाच्या नामांतराच्या प्रशद्ब्रावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत.

मानवी साखळीची तयारी, आर्थिक मदतही 

उरण : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी १० जून रोजी मानवी साखळी करण्याची घोषणा नामांतरण समितीने केली असून या आंदोलनासाठी नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता उरणमधील गावोगावी बैठका सुरू आहेत. यासाठी नागरिकांकडून आर्थिक मदतही दिली जात आहे.

विमानतळाच्या नामांतराच्या प्रशद्ब्रावरून स्थानिक भूमिपुत्र आक्रमक झाले आहेत. रायगड, नवी मुंबई, ठाणे व पालघर या जिल्ह्यांतून दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त एकत्र येत आहेत. अनेक वर्षांपासून ही मागणी होत असली तरी गांभीर्याने न घेतल्याने हा वाद पेटला आहे.   आगरी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जी. एल.पाटील यांच्या स्मृतिदिनी १० जून रोजी मानवी साखळी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनात  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे याकरिता समितीच्या माध्यमातून गावागावांत बैठका सुरू करण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये भूमिपुत्रांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे.

२९ जणांना पोलिसांकडून नोटिसा

पनवेलमध्ये दोन्ही गटांकडून फलक लावले जात असून ते फलक फाडण्याचा प्रकारही समोर आला आहे. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलिसांनी बैठका सुरू केल्या आहेत. रविवारी पनवेलच्या ३३ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पनवेलमध्ये घेण्यात आली. साहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांनी ग्रामस्थांची समजूत काढताना नामकरणाच्या वादावर निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राचा असल्याचे सांगितले. नवी मुंबई पोलिसांनी याचदरम्यान २९ जणांना कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून प्रतिबंधक कार्यवाहीच्या नोटिसा बजावल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2021 12:07 am

Web Title: meetings for the airport naming movement akp 94
Next Stories
1 बहिणीच्या प्रियकराची हत्या करणाऱ्यांना अटक
2 आठ केंद्रांत एकही रुग्ण नाही
3 सीसीटीव्ही प्रकल्प कंत्राटाच्या विरोधात जनमत
Just Now!
X