जॉन पॉल सार्त् यांनी लिहिलेल्या ‘मेन विदाऊट शॅडोज’ या नाटकाचा प्रयोग पनवेलमधील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात बुधवार, १३ जानेवारीला सायंकाळी सात वाजता रंगणार आहे. या नाटकाचे रुपांतर विजय बोंद्रे यांनी केले आहे, तर अमित पाटील यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.
बसणी पंचक्रोशी ग्रंथालय या संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे. ओंकार पाटील, सुप्रीती शिवलकर, कौस्तुभ केळकर, स्वानंद मयेकर, निशांत जाधव, जयेंद्र शिवलकर, प्रवीण धूमक, गणेश शिरोडकर, साई प्रसादे आणि अजित पाटील यांच्या या नाटकात भूमिका आहेत.
१९४४ साली फ्रान्सचा काही भाग हिटलरने जिंकला. आपले गाव मुक्त करण्यासाठी तिथल्या तरुणांनी केलेल्या संघर्षांची ही कहाणी आहे.
असहकार करून गप्प बसण्याची काय किंमत मोजावी लागते आणि कबुलीजबाब दिला तर काय वागणूक मिळते याचा वेध घेणारे सार्त् यांचे हे नाटक आहे.