News Flash

पक्ष्यांचे खारघर

पाणथळ, कांदळवने उपलब्ध असल्याने स्थलांतरित पक्ष्यांचाही मुक्काम

पाणथळ, कांदळवने उपलब्ध असल्याने स्थलांतरित पक्ष्यांचाही मुक्काम

पनवेल : ‘प्रदूषणाचे हब’ अशी खारघरची ओळख होत असली तरी येथील नीरव शांतता, हवामान व रहिवासासाठी योग्य जागा असल्याने पक्ष्यांचे घर अशीही नवी ओळख निर्माण होत आहे. गेल्या दोन महिन्यांत या परिसरात दहा पक्षी छायाचित्रकारांनी सुमारे दोनशे पक्ष्यांच्या प्रजाती आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या असून ही छायाचित्रे त्यांनी नागरिकांसाठी समाजमाध्यमांवरही प्रसारित केली आहेत.

खारघरमध्ये अजूनही डोंगराळ भागासह पाणथळ, कांदळवने उपलब्ध असल्याने येथे स्थलांतरित पक्ष्यांची संख्याही मोठी आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यातील अनेक पक्षी याच परिसरात राहणे पसंत करतात. आयआयटीत शिकणारा २२ वर्षीय तरंग सरीन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले नरेशचंद्र सिंग आणि सध्या गृहिणी म्हणून आणि परदेशात पक्षी व प्राण्याचे प्रशिक्षण घेतलेल्या ज्योती नाडकर्णी यांच्यासह इतर सात जणांनी गेले दोन महिने खारघर परिसरात भटकून विविध पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोनशे पक्ष्यांच्या प्रजाती या काळात दिसून आल्या आहेत. त्यांनी ‘बायडायव्हरसीटी ऑफ खारघर’ या  नावाने फेसबुक पेज तयार केले असून त्यावर या पक्ष्यांची छायाचित्रे प्रसारित केली आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे निसर्गप्रेमींकडून कौतुक होत असून त्यांच्या या फेसबुक पेजला अनेक जण जोडले जात आहेत.

या परिसरात पक्ष्यांसाठी योग्य जागा असल्याने अनेक पक्ष्यांचा वावर असतो. अगदी स्थलांतरित पक्षीही या ठिकाणी असतात.

हे पक्षी नागरिक व मुलांना सहज पाहता येतील, त्यांना निसर्गाप्रति आत्मियता निर्माण होईल यासाठी आम्ही गेले काही दिवस या परिसरातील पक्ष्यांची छायाचित्रे काढली असून ती सर्वासाठी समाजमाध्यमावर प्रसारित केली असल्याचे पक्षीप्रेमी नरेशचंद्र सिंह यांनी सांगितले.

नागरिकांना निसर्गसौंदर्य आणि त्याची जपणूक हे आपलेही कर्तव्य असल्याची जाणीव झाली पाहिजे. निसर्ग हा वाचला पाहिजे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. आमच्यासारखे अनेक जण या चळवळीत  सहभागी झाले आहेत. यातून प्रसिद्धी मिळावी किंवा पैसे कमवावे अशी कोणाचीही इच्छा नाही.

– नरेशचंद्र सिंह, पक्षीप्रेमी आणि छायाचित्रकार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 12:25 am

Web Title: migratory birds stay at kharghar zws 70
Next Stories
1 पंधरा हजार  घरे पडून
2 गिर्यारोहणासाठी गेलेल्या एकाचा मृत्यू
3 जुन्या सिडको घरांचे व्यवहार थांबले
Just Now!
X