News Flash

उरणमध्ये अल्पवयीन नशेबाज

उरण परिसरातील अल्पवयीन मुलेही नशेच्या आहारी जाऊ लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.

उरण परिसरातील अल्पवयीन मुलेही नशेच्या आहारी जाऊ लागल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे. चंगळवादाची शिडी चढत उच्चवर्गातील तरुणांनी तर नशेबाजीत टोकच गाठले आहे; पण या जीवघेण्या व्यसनांचा विळखा आता झोपडपट्टीतील मुलांभोवती अधिकाधिक घट्ट आवळला जात आहे.
नशा आणि गुन्हेगारी
या भागात किरकोळ दरात नशेची साधने उपलब्ध होत असल्याने अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीतही वाढ झाली आहे. अमली पदार्थाची नशा पूर्ण करण्यासाठी घरातील चोरीच्या घटनात वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी चोऱ्या होत आहेत. लग्नसराई आणि अन्य समारंभात मेजवान्या झडत आहेत. याला उंची दारूची सोबत असते. त्याकडे तरुणाईचा कल जास्त असतो. लहान वयात दारूचे व्यसन लागलेल्यांची संख्या त्यामुळे अधिक आहे. शाळा, महाविद्यालयालगतच्या परिसरात सिगारेट आणि तंबाखू, गुटख्याच्या विक्रीस बंदी असतानाही तिथे या पदार्थाची मोठय़ा प्रमाणात विक्री केली आहे.

नशेचे पदार्थ सहज उपलब्ध
* उरण शहरात अनेक ठिकाणी गांजा, चरससारखे नशेचे पदार्थ माफक दरात सहज उपलब्ध.
* रात्री तसेच दिवसा निर्जन स्थळी, पडीक घरे वा जुन्या इमारती, सार्वजनिक बाग वा शहरातील शौचालयात नशेबाजांचा वावर.
* अवघ्या दहा रुपयांत गांजाची पुडी.
* नशेबाजीत मुले ते २५ र्वष वयापर्यंतच्या वर्षांच्या तरुणांचा समावेश.
* डोकेदुखी, सर्दीच्या गोळ्या शीतपेयात टाकून नशाबाजी.
* शिळ्या पावाला आयोडेक्स लावून नशा करणे.
* खोकल्यावरील औषध पिऊन धूम्रपान.

उरण, न्हावा शेवा, मोरा आणि पोर्ट विभागात ज्या परिसरात अशा प्रकारच्या नशेच्या पदार्थाची खरेदी-विक्री केली जात असेल तर त्यांच्यावर पोलीस नजर ठेवून आहेत. अशा ठिकाणी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. अशा प्रकारच्या लोकांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच त्यातील अल्पवयीन मुलांना सुधारगृहात नेऊन उपचार ही करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती पोर्ट विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 5:31 am

Web Title: minor children taking drugs in uran
Next Stories
1 ट्रान्स हार्बरवरील बंकरची कचऱ्याशी लढाई
2 नागरी सत्कारात मंदाताईंचे शक्तिप्रदर्शन
3 माठाला मागणी वाढली
Just Now!
X