शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेली दलालांची दरी दूर करण्यासाठी राज्य सरकार भाजी, फळे आणि कांदा-बटाटा ह्य़ा जीवनावश्यक वस्तूंना एपीएमसीमधून मुक्त करण्याचा विचार करीत असून त्याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे, अशी भूमिका या तीन बाजारांतील व्यापाऱ्यांनी घेतली
आहे. हा बाजार नियंत्रणमुक्त झाल्यास त्याची झळ माथाडी, मापाडी, वाहतूकदार अशा हजारो घटकांना बसणार असल्याने या घटकानेही व्यापाऱ्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता हे तीनही बाजार बंद ठेवून एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारच्या धोरणाविरोधात मंगळवारी कांदा-बटाटा बाजारात आंदोलन  केले जाणार आहे, असे दी फ्रुट अॅण्ड व्हेजिटेबल र्मचट्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी सांगितले.