ऐरोलीतून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा

नवी मुंबई ठाण्यात शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी राष्ट्रवादीच्या अनेक स्थानिक नेत्यांना गळाला लावणाऱ्या भाजपने नवी मुंबईतील आजी-माजी आमदारांना गळास लावण्यास सुरुवात केली आहे. त्यात माथाडी नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य नरेंद्र पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री माथाडी कामगारांचे प्रश्न  सोडविणार असतील तर त्यांची भांडीदेखील घासायला मी तयार आहे, असे वक्तव्य पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी केले होते. त्या वेळेपासून पाटील यांची भाजपजवळीक स्पष्ट झालेली आहे. पाटील यांना ऐरोली विधानसभा अथवा सातारा जिल्ह्य़ातील पाटण मतदारसंघ देण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस
DCM Devendra Fadnavis On Congress
“मोदी हे महायुतीचं इंजिन, तर राहुल गांधींच्या ट्रेनचं…”; देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा
Lok Sabha Election 2024 Roadshow of Rahul Gandhi and Priyanka Gandhi in Pune
‘पुण्या’साठी राहुल, प्रियंका गांधी यांचा ‘रोड शो’; शरद पवार, उद्धव ठाकरेंच्याही सभा
Narendra Modi criticism that Shiv Sena is fake with Congress
काँग्रेसबरोबर नकली शिवसेना! नरेंद्र मोदी यांची टीका, चंद्रपुरात पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदारकी व राष्ट्रवादीच्या पक्ष सदस्यांचा राजीनामा देताना डावखरे यांच्यासोबत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र पाटील होते. त्यामुळे डावखरे यांचे मनोधैर्य वाढविण्याचे काम पाटील यांनी केली असल्याची चर्चा आहे. तो पुढे हो मी मागून येतो असाच जणू काही संदेश त्यांनी मित्राला दिल्याची चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी सानपाडा येथे आलेले असताना पाटील यांच्या घरी पाहुणचार घेतला होता. भाजप-सेना युतीच्या सरकारमध्ये गेली साडेतीन वर्षे पाटील यांची जवळीक भाजपच्या नेत्यांशी वाढली आहे. त्यामुळे पाटील आज ना उद्या भाजपवासी होणार अशी चर्चा  माथाडी वर्तुळात आहे. पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेतून आमदार केले खरे, पण त्यांच्या विधानसभा उमेदवारीचे स्वप्न राष्ट्रवादीत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. नवी मुंबईतील ऐरोली या उत्तर मतदारसंघात मागील निवडणुकीत बंडखोरी करण्याची तयारी केल्याने त्यांना शांत करण्यासाठी विधान परिषद देण्यात आली होती. त्यांची समजूत काढण्यााठी दस्तुरखुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार पाटील यांच्या घरी गेले होते. या मतदारसंघात माथाडी मतदार मोठय़ा प्रमाणात असून त्यांच्या बळावरच आमदार संदीप नाईक यांची नौका दोन वेळा पार झालेली आहे. ही ताकद पाटील यांना माहीत असल्याने त्यांनी दबाव आणून विधान परिषद पदरात पाडून घेतली. राष्ट्रवादीमध्ये राहून  विधानसभा उमेदवारी मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी भाजपमध्ये चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.

पाटण मतदारसंघाला पसंती

पाटील यांनी सातारा जिल्ह्य़ातील पाटण मतदारसंघाला पहिली पसंती दिली आहे. या मतदारसंघात त्यांची पत्नी डॉ. प्राची पाटील यांनी विविध बचत गटांच्या माध्यमातून चांगली बांधणी गेली दोन वर्षे सुरू केली आहे.

हा मतदारसंघ माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यांचा मुलगा सत्यजित हे पुढील निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुन्हा उमेदवार राहणार हे निश्चित आहे. या वेळी शिवेसनेचे आमदार शंभुराज देसाई यांच्या ताब्यात आहे. तो खेचून आणण्याासाठी माथाडी नेते पाटील यांचा उपयोग भाजपला होणार असून पाटील यांच्या शिवाय दुसरा उमेदवार त्या ठिकाणी नाही. ऐरोली मतदारसंघही पाटील यांच्यासाठी सोयीस्कर असून येथील भाजपचा मागील विधानसभा निवडणुकीतील उमेदवार वैभव नाईक हे पक्षात निष्क्रिय ठरलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघातूनही उमेदवारी मिळाल्यास पाटील तगडी लढत देण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटण आणि ऐरोली हे दोन मतदारसंघ पाटील यांच्यासाठी भाजपकडून मिळण्याची आशा आहे.

डावखरे हा माझा विधान परिषद सहकारी आहे. सर्व सुख-दु:खात आम्ही सहभागी आहोत. ठाणे जिल्ह्य़ात होणारी निरंजनची कोंडी मला माहीत आहे. भाजप अथवा कुठूनही तो पुन्हा आमदार होणार असेल तर मित्र म्हणून मला आनंदच आहे. मित्र म्हणून प्रत्येक क्षणाला साथसोबत दिलीच पाहिजे. पक्ष सोडण्याचा निर्णय हा त्याचा सर्वस्वी आहे. मी त्यांच्यासोबत असल्याने गैरसमज पसरविण्यात आलेला आहे. माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवरून मी सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्याना भेटत आहे. त्यातूनही गैरसमज होत आहेत.

– नरेंद्र पाटील, माथाडी नेते तथा आमदार, विधान परिषद