News Flash

नवी मुंबईची हवा ‘अत्यंत वाईट’ स्तरावर

औद्योगिक प्रदूषण नसल्याचा मंडळाचा दावा

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबईची हवा बदलली आहे. बदलत्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगत आहेत. गुरुवारी दिवसभरात शहरातील हवेचा  पोत तपासण्यात आला. तेव्हा तो अत्यंत वाईट या स्तरावर नोंदला गेला. नवी मुंबईची हवा ३१० एककात ‘सफर इंडिया’ या संस्थेच्या वतीने नोंदविण्यात आली. त्यामुळे ऊन-पावसाच्या खेळात आरोग्याच्या तक्रारींनी बेजार झालेल्या नवी मुंबईकरांना तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक असल्याचे म्हटले आहे. मात्र महाराष्ट्र प्रदूष ण नियंत्रण मंडळाने नवी मुंबईत औद्योगिक प्रदूषण नसल्याचे म्हटले आहे. ‘सफर’ या खासगी संस्थेच्या अभ्यासातील निष्कर्ष आम्ही मानीत नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई शहरात काही दिवसांपासून सकाळी हवेत धके पसत आहे.  शहरात तरंगत्या धुलीकणांचे  प्रमाण सर्वाधिक असल्याची नोंद केली.  शहरातील ७० टक्के  कंपन्या बंद झाल्या आहेत. ३० टक्के  कंपन्या सुरू आहेत, असे मंडळाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. हिवाळ्यात तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण मोठे असल्याचे दाखवले जात असले तरी  ही सर्व प्रमाण तांत्रिक आहेत. प्रत्यक्षात शहरातील हवा ‘अत्यंत वाईट’ या स्तरात मोडत नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

हे धुलिकण शहरात मोठय़ा प्रमाणावर होत असेलली नवी बांधकामे आणि वाहनांतून उत्सर्जित होणाऱ्या कॉर्बन मोनॉक्साइडमुळे प्रदूषणात भर पडली आहे. असे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच म्हणणे आहे.

नवी मुंबईत तरंगत्या धुलिकणांचे प्रमाण ३१० दाखवण्यात आले होते. त्यामुळे याबाबत सविस्तर माहिती घेऊनच अधिक माहिती देण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण निंयत्रण मंडळाचे अधिकारी डॉ. अनंत हर्षवर्धन यांनी सांगितले.

अशक्तपणाच्या तक्रारींत वाढ

शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. श्वास घेताना त्रास होत असल्याच्या तक्रारी श्वसनविकार तज्ज्ञांकडे अनेक नागरिक करीत आहेत. वातावरणातील बदलांमुळे  सकाळी थंड वातावरण, तर दुपारी उष्मा जाणवत आहे. या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला  अशक्तपणाच्या तक्रारी दवाखान्यांमध्ये येणारे नागरिक करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 12:35 am

Web Title: navi mumbai airs at extremely bad level abn 97
Next Stories
1 पनवेलकरांवरही मालमत्ता कर
2 सिडकोच्या सर्व प्रकल्पांसाठी २२.५ टक्के भूखंडांचा तोडगा
3 शहरातील तयार प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
Just Now!
X