News Flash

नवी मुंबईचे भाजपा आमदार गणेश नाईकांच्या नातवाला मारहाण

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

माजी मंत्री आणि भाजपाचे आमदार गणेश नाईक यांच्या नातवाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन बुधवारी मुरबाडजवळच्या टोकावडेजवळ ही मारहाण करण्यात आली. गणेश नाईक यांचे नातू आणि माजी खासदार संजीव नाईक यांचे पुत्र संकल्प संजीव नाईक आणि त्याचा मित्र तजेंद्रसिंग हरजितसिंग यांना मारहाण केल्याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संकल्प नाईक मित्र तजेंद्रसिंग मंत्री याच्यासह कृषी केंद्र शोधत असताना तळवली गावाजवळ पोहोचले. तिथे त्यांनी आपली चारचाकी गाडी अचानक वळवली. यावेळी मागून येणारी दुचाकी कारला धडकली. खाली पडलेला दुचाकीस्वार प्रवीण लिहेयाची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या संकल्प नाईक आणि तजेंद्रसिंग मंत्री यांना निलेश देसले आणि त्यांच्या तीन साथीदारांनी मारहाण केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 9:19 am

Web Title: navi mumbai bjl mla ganesh naik grandson sankalp naik attacked sgy 87
Next Stories
1 लक्षणे नसलेल्या बाधितांमुळे रुग्णविस्फोट
2 नव्या रुग्णांचा उच्चांक ; गुरुवारी ६८१ करोनाबाधित
3 खाद्यतेलांना महागाईची फोडणी
Just Now!
X