दिवसाला ९७० चाचण्यांचे लक्ष्य; चाचण्यांना वेग
नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर १ हजार चाचण्यांची क्षमता असलेल्या प्रयोगशाळेत दिवसाला ९७० पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. आजवर १ लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या प्रतिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.
ठाणे शहरातील १७५ जणांच्या चाचण्यांचा अहवाल पालिका प्रयोगशाळेतून करण्यात आला आहे. तर पनवेल पालिका करोना चाचणी प्रयोगशाळा बनवण्यासाठी चाचपणी करत आहे. महापालिकेतीलच नागरिकांच्या जास्तीत जास्त चाचण्या करण्यात येत असल्याने सध्या इतर शहरांच्या चाचण्या अद्याप करण्यात येत नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.
पनवेलमध्ये प्रयोगशाळा उभारण्याबाबतची माहिती नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात येत आहे. आर्थिक तरतूद व इतर बाबी याबाबत विचार सुरू असल्याची माहिती पनवेल पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.
पालिकने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर चाचण्यांना वेग आला.
एकूण चाचण्या
प्रतिजन चाचण्या : ६६,११८
आरटीपीसीआर चाचण्या : ४६,००२
एकूण करोना चाचण्या : १,१२,१२०
नवी मुंबईतील अद्ययावत प्रयोगशाळेबाबत पनवेल, नागपूरमधून विचारणा करण्यात येत आहे. शहरात प्रतिदिन १ हजार चाचण्यांचे लक्ष्य असून जवळजवळ दिवसाला ९७० चाचण्या केल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करणे हे लक्ष्य आहे.
– अभिजीत बांगर, पालिका आयुक्त.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 25, 2020 2:14 am