अश्विनी बिद्रे खूनप्रकरणी वूडकटरच्या शोधासाठी प्रयत्न

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शहर व ग्रामीण भागात झडती सत्र कायम ठेवले आहे. संशयित आरोपी पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्या राजेंद्रनगरातील बंगल्याची, तर आजरा येथे महेश फळणीकर याच्या घराची झडती घेतली.

बिद्रे-गोरे खून प्रकरणी  मुंबईतील गुन्हे अन्वेषणच्या दोन पथकांनी कोल्हापूर, आजरा आणि आळते (ता. हातकणंगले) येथे तपास सुरू केला आहे. अभय कु रुंदकर याच्या येथील  राजेंद्रनगरातील बंगल्यात तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो  यांच्या पथकाने झडती घेतली. बिंद्रेंच्या गावी सासऱ्यांचा जबाब घेण्यात आला.

या तपासात काही महत्त्वाची माहिती  तपास अधिकारी शिंदे यांच्याकडे मिळाली असल्याचे सांगण्यात येते . तपासाचा रोख हा  अभय कु रुंदकर याने लिहिलेल्या  डायरी आणि त्यातील तपशील मिळवण्यावर आहे. संशयित आरोपींची पोलिस कोठडी मुदत  संपत आली असल्याने  शक्य तेथे चौकशी करण्यात आली.  बिद्रेंचे पती , मनसेचे माजी जिल्हा प्रमुख राजू गोरे दिवसभर पथकाबरोबर होते. पोलिस मुख्यालयात नोकरी करीत असलेल्या एका पोलिसाकडे  कु रुंदकरच्या मालमत्तेबाबत  माहिती असल्याने कसून तपासणी केली जाणार आहे .

दरम्यान , आजरा येथे असलेल्या कु रुंदकरांच्या फार्म  हाऊसची झडती घेतल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस यंत्रणा तपास करण्यासाठी आजरा  येथे दाखल झाले. गेल्या १० दिवसात  तीन वेळा पोलीस पथक आजऱ्यात आले आहे. बिद्रे यांचा  खून करून मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकून दिल्याचे फळणीकर याने सांगितल्याने त्यासाठी वापरलेल्या वूडकटरच्या शोधात जंगजंग पछाडले जात आहे. सायंकाळी आजऱ्यात दाखल पथकाने फळणीकरला त्याच्या गणपती गल्लीतील घरी नेऊ न  प्रत्येक खोलीची झडती घेतली. तब्बल दीड तास झडती करून पंचनामा केल्यानंतर हे पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.