28 February 2021

News Flash

उद्योगविश्व : प्लास्टिक गोणींची मक्तेदारी

१९९० मध्ये सिल्वासा येथे एक आणखी युनिट सुरू करण्यात आले.

उद्योजक- संजय मेहता

उद्योजक- संजय मेहता

पावणा औद्योगिक वसाहतीमध्ये गेली सत्तावीस वर्षे विविध प्रकारच्या रासायनिक, खत, औषध, काच, रंग आणि अभियांत्रिकी कारखान्यांना पॅकेजिंगसाठी लागणारे उच्च प्रतीचे प्लास्टिक साहित्याचा पुरवठा करणारे आयआयटीयन्स वामन नाडकर्णी यांच्या लक्ष्मी पॉलीप्लास्ट इंड्रस्ट्रिजची घोडदौड आजही कायम आहे. समजणाऱ्या भाषेत सांगायचे तर नाडकर्णी यांचा कारखाना विविध प्रकारच्या प्लास्टिक गोणी पुरवठा देशातील कमीत कमी ७२ छोटय़ामोठय़ा कारखान्यांना करीत आहे. प्लास्टिक म्हटले की, आज पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या समोर येतात, मात्र बडय़ा कारखान्यांचे उत्पादन वेष्टनयुक्त करण्यासाठी नाडकर्णी यांच्या गोणी कामाला येत असल्याने कमी जाडीच्या पिशव्याशी लक्ष्मी कारखान्याचा तसा दूरान्वये संबंध नाही, पण याच अज्ञानातून पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी लक्ष्मीला नोटीस पाठवली होती.

देशात विविध प्रकारच्या रासायनिक, खत, औषध, रंग, काच कारखान्यांना उत्तम प्रतीच्या व जाडीच्या गोणींची आवश्यकता भासते. ही गरज नाडकर्णी यांची पावणा येथील लक्ष्मी इंडस्ट्रिज कंपनी पूर्ण करते. त्यामुळेच बीएसएफ, फायझर, मार्क, आणि झायडससारख्या देशातील ७२ बडय़ा कंपन्यांना लागणाऱ्या प्लास्टिक गोणींचा पुरवठा नाडकर्णी यांच्याकडून केला जात आहे. नवी मुंबईतील एका बडय़ा कंपनीच्या सेल्स ऑफिसरने मध्यंतरी लक्ष्मीला ऑर्डर देण्यास टाळाटाळ केली आणि त्यामुळे बिल मिळण्यास विलंब लागला.

लक्ष्मीने या उद्योगात आपले एक नाव तयार केले असल्याने त्या बडय़ा कंपनीला नाडकर्णी यांनी नम्रपणे यानंतर काम नको असल्याचे सांगितले. त्यामुळे कंपनीच्या संचालकांची पळापळ सुरू झाली. आपल्या उत्पादनावर ठाम विश्वास असलेल्या नाडकर्णी यांनी कधी उत्पादनाच्या क्वालिटीबरोबर समझोतो केला नाही. पवईतील आयआयटीमधून पॉलिमर क्षेत्रातील पदवी घेतल्यानंतर हैदराबाद येथील एका कंपनीत सहा महिने काढल्यानंतर हेक्स फार्मासिटिकल कंपनीत नाडकर्णी यांचे बस्तान बसले. नोकरीत पदोन्नतीच्या मर्यादा असल्याने काही काळ येथे अनुभव घेऊन नाडकर्णी आपले बंधू त्रिंबक नाडकर्णी यांच्या कारखान्यात सोबतीला आले. नाडकर्णी यांच्या बंधूच्या मुलीच्या- लक्ष्मीच्या नावावरच या कारखान्याचे नाव लक्ष्मी आहे.

नोकरी आणि उद्योगातील धावपळ एकाच वेळी सांभाळणे कठीण झाल्याने नाडकर्णी यांनी हेक्ससारख्या सुखवस्तू कारखान्यातील नोकरीला रामराम ठोकला आणि पॉलिमरमधील अनुभवाला सुरुवात झाली. एसकेएफ बेअरिंगमधील पहिल्या कामाने लक्ष्मीच्या कामाचा श्रीगणेशा झाला आणि मग या कारखान्याने पॉलिमर साहित्य बनविण्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. नवी मुंबई औद्योगिक कारखान्यात सुरू झालेल्या कामगार युनियनच्या दबंगगिरी, स्थानिक कर, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे एक दिवस पावना येथील कारखान्याला टाळे ठोकून नाडकर्णी यांना सिल्वासाला बस्तान बसवावे लागले. १९९० मध्ये सिल्वासा येथे एक आणखी युनिट सुरू करण्यात आले. सिल्वासा येथील कारखान्याला गती मिळू लागल्यानंतर काही वर्षांनी पावना येथील कारखाना एका कामगार नेत्याच्या सहकार्याने सुरू होऊ शकला. त्यामुळे प्रवासाच्या दृष्टीने न परवडणाऱ्या सिल्वासा येथील युनिट बंद करून ते पनवेल येथे स्थलांतरित करण्यात आले.

त्यामुळे आजच्या घडीला नाडकर्णी यांच्या लक्ष्मीमध्ये चाळीसपेक्षा जास्त कामगार काम करीत असून वर्षांला पंधरा-सोळा कोटींपर्यंत वार्षिक उलाढाल नेली जात आहे. केवळ प्लास्टिक गोणी बनविण्यापुरते मर्यादित न राहता नाडकर्णी स्वत:च्या कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामग्रीदेखील स्वत:च उत्पादित करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांनी बनवलेली वॉटर सोल्युबल फिल्म पाण्यात टाकल्यानंतर काही मिनिटांत विरघळून जात आहे. पॉलिमर क्षेत्राबरोबरच सौर ऊर्जेला महत्त्व देणाऱ्या नाडकर्णी यांना आता अशाच काहीशा वेगळ्या वाटा चोखाळण्याची इच्छा आहे. पनवेल येथे सिडकोच्या साडेतीन हेक्टर जमिनीवर उभारण्यात आलेले आकर्षक उद्यान नाडकर्णी यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे उभे राहिले आहे. समाजात मनाला खटकणाऱ्या घटना वरिष्ठापर्यंत पोहोचविणे हा नाडकर्णी यांचा ध्यास आहे. नवीन पिढीने स्वयंपूर्ण व्हावे, असा एक मंत्र नाडकर्णी नवीन पिढीला देत असतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 3:49 am

Web Title: navi mumbai entrepreneur sanjay mehta success journey
Next Stories
1 गोष्टी गावांच्या : शैक्षणिक पंढरी
2 उरणचे किनारे असुरक्षितच
3 शाळेच्या परिसरात पाच बार
Just Now!
X