News Flash

पनवेलमध्ये अग्नितांडव, ५० ते ६० झोपड्या जळून खाक

विजेची वायर तुटून एका झोपडीवर पडल्याने ही आग लागली

पनवेलमध्ये अग्नितांडव, ५० ते ६० झोपड्या जळून खाक

नवी मुंबईतील पनवेलमध्ये ५० ते ६० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. विजेची वायर तुटून एका झोपडीवर पडल्याने ही आग लागल्याचे समजते. या आगीत जीवितहानी झालेली नाही. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

पनवेलमधील तक्का परिसरात बुधवारी रात्री झोपड्यांना भीषण आग लागली. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परिसरातील ५० ते ६० झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. विजेची वायर तुटून एका झोपडीवर पडली आणि ही आग लागली. आगीत सिलिंडरचाही स्फोट झाल्याने आग वेगाने पसरली, अशी माहिती समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2018 7:02 am

Web Title: navi mumbai fire broke out in slums of panvel no casualties reported
Next Stories
1 हेमंत नगराळे नवी मुंबईतच?
2 आयुक्त शिंदे यांना पनवेलकरांचा पाठिंबा
3 क्रीडांगणासाठी एक कोटीचा निधी
Just Now!
X