News Flash

देखभालीअभावी उद्यानांची दुरवस्था

कोपरखैरणे ते दिघा परिसरातील उद्यानांमधील खेळणी साहित्य नादुरुस्त

कोपरखैरणे ते दिघा परिसरातील उद्यानांमधील खेळणी साहित्य नादुरुस्त

देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने नवी मुंबई शहरातील काही मोजकी उद्याने वगळता इतरांची दुरवस्था होत आहे. त्यात कोपरखैरणे ते दिघा परिसरातील उद्यानांमधील खेळणी साहित्य खराब झाल्याने सुट्टीत मुलांना खेळायला जायचे कुठे? असा प्रश्न निर्माण होत आहे. काही ठिकाणी तर अंधारात दारूच्या पाटर्य़ा रंगत असून गर्दुल्ल्यांचा अड्डा बनत आहेत.

उन्हाचा पारा शहरात चांगलाच चढला आहे. त्यात काही शाळांना सुट्टी लागली असून काही शाळांची परीक्षा संपत आल्या आहेत. त्यामुळे उद्यानांमध्ये बच्चे कंपनींची मोठी गर्दी होत आहे. नवी मुंबईतील विविध नोडमधील उद्यानांत विविधता असल्याने बच्चेकंपनी बरोबर नागरिकांना आपली हक्काची जागा म्हणून उद्यानांकडे पाहिले जाते. शहरात १६५ उद्याने आहेत. यापैकी ११७ तर वाशी ते बेलापूर नोडमध्ये तर ४६ उद्याने कोपरखैरणे ते दिघा परिसरात आहेत. वाशी ते बेलापूर नोडमधील काही मोजकी उद्याने सोडली तर बाकी उत्तम अवस्थेत आहेत. मात्र, कोपरखरणे ते दिघा परिसरातील उद्यानांची अवस्था देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने वाईट झाली आहे. कोपरखैरणे सेक्टर चौदा, ऐरोली सेक्टर ३, दिघ्यातील ठाणे-बेलापूर मार्गालगतचे उद्यान अशी काही अपवादात्मक उद्याने सुस्थितीत आहेत. इतर सर्व ठिकाणी बच्चे कंपनीसाठी लावण्यात आलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली असून सुकलेली झाडे, तुटके गेट अशी दुरवस्था आहे. या भागात घणसोलीतील सेंट्रल पार्क वगळता एकही उद्यान वैशिष्टय़पूर्ण नाही. सेंट्रल पार्कचेही काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण न झाल्याने या सुट्टीत ते खुले होऊ शकत नाही.

कोपरखरणेत वाईट अवस्था

कोपरखरणे सेक्टर २२च्या उद्यानातील झोपाळा तुटला असून फक्त रॉड उभा केला आहे. तर सेक्टर १५ कै. शिवाजीराव पाटील उद्यान बंद असून हत्तीची मूर्ती तुटलेली आहे. सेक्टर ७ अण्णासाहेब पाटील उद्यानातील झोपाळा तुटल्याने गुंडाळून ठेवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 12:38 am

Web Title: navi mumbai garden in bad condition
Next Stories
1 नवी मुंबईतील कचरा ‘भूमिगत’ होणार
2 जाहिरात ‘घोटाळ्या’ला लगाम
3 जड वाहनांचा तळोजामार्गे ‘बायपास’
Just Now!
X