विमानतळ उभारणीसाठी आवश्यक असलेली प्रमुख कामे मार्गी लागल्यानंतर सिडकोने आजूबाजू्च्या पायाभूत सुविधा आणि चार पंचतारांकित हॉटेलांचा प्रस्ताव तयार करण्यास घेतला आहे. यापूर्वी याच परिसरात एबीआयएल कंपनीने ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी विकत घेतला होता पण विमानतळाच्या कामांना वेळीच सुरुवात न झाल्याने त्यांनी हा भूखंड निवासी वापर बदल करून घेतल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. भविष्यात विमानतळाची प्रवासी संख्या पाहता या ठिकाणी चार-पाच पंचतारांकित हॉटेल्सची आवश्यकता आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्राचे १६ हजार कोटी रुपये खर्चाचे काम जी. व्ही. के. बांधकाम कंपनीला प्राप्त झाले असून त्यांच्या निविदेवर राज्य सरकाराने मोहर उमटवली आहे. पुढील वर्षी या कंपनीला प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करणारी वित्तसंस्था मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विमानतळपूर्व कामांना जोरात सुरुवात झाली आहे. विमानतळाचा दोन हजार हेक्टरचा परिसर हा पायाभूत सुविधांपासून दूर आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ते, पाणी, गटार, वीज या सुविधांची तरतूद करावी लागणार आहे.

Pune city leads the country in house sales Pune news
घरांच्या विक्रीत देशात पुण्याची आघाडी! जाणून घ्या शहरातील कोणत्या भागाला सर्वाधिक पसंती…
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…
Bird Wardha
आंतरराष्ट्रीय पक्षीगणना ! वर्धा जिल्हा नोंदणीत अग्रेसर, आढळले ‘हे’ पक्षी
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

जगातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेलांची मोठी साखळी आहे. त्यामुळे भविष्यातील आवश्यकता लक्षात घेऊन सिडकोने या भागात मोकळ्या भूखंडाचा शोध सुरू केला आहे. लवकरच या भूखंडांची जागतिक निविदा काढली जाणार आहे. यापूर्वी सिडकोने पंचतारांकित हॉटेलची एक निविदा प्रसिद्ध केली होती. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या एबीआयएल कंपनीने हा ३० हजार चौरस मीटरचा भूखंड विकत घेतला होता, पण विमानतळ दृष्टिक्षेपात नसल्याने त्यांनी या भूखडांचा निवासी वापर बदल घेतला. त्यासाठी लागणारे वापर बदल शुल्क सिडकोत भरले होते. पण हे प्रकरण नंतर सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले.

पेट्रोल पंपाचे भूखंडदेखील विक्रीस

विमानतळपूर्व कामांना जोरात सुरुवात झाली आहे. या कामांसाठी हजारो ट्रक आणि इतर यंत्रसामग्री दिवस-रात्र कार्यरत आहे. मात्र त्यांच्या इंधनाची व्यवस्था जवळपास नाही. त्यामुळे लवकरच या भागात पेट्रोलपंपचे भूखंडदेखील विक्रीस काढले जाणार आहेत.

विमानतळपूर्व किंवा मुख्य कामांचा केवळ विचार न करता विमानतळपुरक कामांची सुरुवात देखील याच काळात करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा यांची उभारणी एकाच वेळी होऊ शकणार आहे. यात विमानतळ परिचलन कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वसाहतींचा देखील विचार केला जाणार असून जागतिक पातळीवर पंचतारांकित हॉटेल भूखंडांच्या लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत.

भूषण गगराणी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको