मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने नवी मुंबई, औरंगाबाद महानगरपालिका, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपालिकांसह राज्यातील सर्व निवडणुकांची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी के ली.

निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला केली होती. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार प्रतिबंधात्कम उपाययोजना म्हणून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकण्यात येत असल्याचे मदान यांनी जाहीर के ले. नैसर्गिक आपत्ती किं वा आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य निवडणूक आयोगास अधिकार आहे. राज्यातील १९ जिल्ह्य़ांमधील १५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रि या पूर्ण झाली असून, ३१ मार्चला मतदान होणार होते.

पण या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक, नाशिक, ठाणे, धुळे, परभणी या महापालिकांमधील पोटनिवडणूकही लांबणीवर टाकण्यात आली. वसई-विरार महानगरपालिका, अंबरनाथ, कु ळगवा-बदलापूर, वाडी, राजगुरूनगर, के ज, भोकर, मोवाड या नगरपालिका अथवा नगर पंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, १२ हजार ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेची सुरू असलेली कार्यवाही स्थगित करण्यात आली आहे. आढावा घेऊन नव्याने आदेश जारी के ली जातील, असे  आयोगाने स्पष्ट केले.