News Flash

नवी मुंबईत संततधार

नवी मुंबई शहरात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखरणे, ऐरोली या उपनगरांवर पावसाचा परिणाम झाला.

ऐरोलीत सर्वाधिक पाऊस; काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गुरुवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. बेलापूर, नेरुळ, वाशी, कोपरखरणे, ऐरोली या उपनगरांवर पावसाचा परिणाम झाला. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाल्याची पाहायला मिळाली. काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. सर्वाधिक पाऊस ऐरोली विभागात पडल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

नवी मुंबईत बुधवारी मध्यरात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी शहरात विविध ठिकाणी पावसाची संततधार सुरूच होती. काही ठिकाणी गुरुवारी सकाळी पावसाचा वेग वाढला होता. शहरात पालिकेने नालेसफाई व आपत्कालीन व्यवस्थेबाबत अधिक दक्षता ठेवल्याने शहरात मोठय़ा प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. शहरातील नालेसफाई पूर्ण करण्यात आली असून रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गात काही ठिकाणी पाणी वाहून जाण्याच्या यंत्रणा सज्ज असल्याने पाणी साठण्याच्या घटना आढळून आल्या नाहीत. पाणी उपसा करण्यासाठी पंपाची सोय केली असून होल्डिंग पॉण्डचे पाणी शहरात घुसू नये यासाठी मोठय़ा पंपांची सोय केल्याची माहिती पालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2021 3:21 am

Web Title: navi mumbai most rainfall in airoli ssh 93
Next Stories
1 परिवहन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग
2 एक हजार लाभार्थीना पहिल्या टप्प्यात घरांचा ताबा
3 विमानतळ नामकरणासाठी गावबैठका
Just Now!
X