21 September 2020

News Flash

२५१ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे

नवी मुंबई पालिकेचा प्रयोगशाळा, समूह तपासणीवर सर्वाधिक खर्च

नवी मुंबई पालिकेचा प्रयोगशाळा, समूह तपासणीवर सर्वाधिक खर्च

नवी मुंबई : करोनाकाळातील खर्चापोटी नवी मुंबई महापालिकेने राज्य शासनाकडे २५१ कोटी रुपये अनुदानाचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती पालिकेच्या वित्तविभागाने दिली.

शहरात एकूण १९ हजारहून अधिक जण बाधित झाले आहेत. त्यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधी खर्च झाला आहे. सिडको प्रदर्शनी केंद्रात १,१८३ खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले. याशिवाय प्राणवायू पुरविण्याची सोय असलेल्या खाटा, अतिदक्षता विभागातील खाटा आणि विविध आरोग्यसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. त्याच वेळी रुग्णांसाठी नाश्ता आणि जेवणाची सोयही करण्यात आली आहे. शहराबाहेर उभारलेल्या करोना काळजी केंद्र  आणि नेरुळ येथे पालिकेने उभारलेली स्वतंत्र करोना चाचणी प्रयोगशाळा  आणि रोज होणाऱ्या स्व्ॉॅब चाचण्या, रक्तचाचण्या आणि पीपीई खरेदीसाठी पालिकेकडील मोठा निधी वापरण्यात आला आहे. याशिवाय आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सक्षम मनुष्यबळही वापरण्यात आले आहे.

राज्य कामगार विमा योजना रुग्णालय कोविडसाठी

नवी मुंबई : करोनाकाळात वाशीतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय उपयोगात आणण्यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य विमा कामगार योजना रुग्णालयात प्राणवायू पुरविणारी यंत्रणा असलेल्या खाटा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.

संभाव्य रुग्णसंख्या वाढ लक्षात घेऊन खाटांची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. सध्या खाटांची कमतरता पाहता वाशी सेक्टर-५मधील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय कोविडसाठी उपयोगात आणण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या या रुग्णालयात शासकीय कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार दिले जात आहेत. अर्थात त्यांची रुग्णालयातील संख्या कमी आहे. त्यामुळे या रुग्णालयात कोविडसाठी ताब्यात घेतल्यास पालिकेस नाव पर्याय उपलब्ध होईल. रुग्णालयात १५० ते २०० खाटांची सुविधा उपलब्ध होईल.

आजवरचा खर्च

३३ कोटी रुपये रुग्णालय उभारणी, खाटा

१८३ कोटी रुपये समूह तपासणी, प्रयोगशाळा आणि इतर साहित्य खर्च

२.५ कोटी आपत्ती व्यवस्थापनावर खर्च

१३ कोटी रुपये स्वच्छता, जैविक  कचरा

२० कोटी रुपये आहारासाठी खर्च

२० लाख मालमत्ता विभागाद्वारे खर्च

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 13, 2020 1:36 am

Web Title: navi mumbai municipal corporation highest expenditure on laboratory and group testing zws 70
Next Stories
1 नवी मुंबई : शहरात आज नव्यानं आढळले ४०७ करोनाबाधित
2 खाटांसाठी करार, मागणीपत्र
3 संघटना बळकटीसाठीच्या बैठकीत ‘आरोग्य’ दुर्लक्षित
Just Now!
X