News Flash

नवी मुंबई महापालिका निवडणूक आरक्षण

प्रमुख नेत्यांचे प्रभाग आरक्षित

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी शनिवारी वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात प्रभाग आरक्षण सोडत घेण्यात आली. यामध्ये महापौर जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे, विरोधी पक्षनेता विजय चौगुले यांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत.

एप्रिल महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. महापालिकेत १११ प्रभाग असून ५६ महिला व ५५  पुरुष लोकप्रतिनिधी असणार आहेत. आरक्षित प्रभागांमध्ये अनुसूचित जातीसाठी १०, अनुसूचित जमातींसाठी २, नागरिकांची मागास प्रवर्गासाठी ३० तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी  ६९ प्रभाग अशी स्थिती आहे.

प्रारूप प्रभागरचनेबाबत काही हरकती असतील व सूचना सादर करावयाच्या असतील तर ३ ते १० फेब्रुवारीपर्यंत सादर कराव्यात.

– अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 1:49 am

Web Title: navi mumbai municipal election reservation abn 97
Next Stories
1 विमानतळासाठी ‘एसबीआय’कडून वित्तपुरवठा
2 ‘एक्स्प्रेस’वर एसटी चालकांकडून बेशिस्त
3 देवगडच्या हापूस आंब्याची मुंबईच्या बाजारात झलक
Just Now!
X