प्रदूषणात शहर ३६ व्या क्रमांकावर; ९३ दगडखाणींच्या धडधडीतून धुलिकणांची मात्रा अधिक

आरोग्याला घातक ठरणाऱ्या हवेतील धूलिकणांचा जागतिक पातळीवर आरोग्य संघटनेने नुकत्याच सादर केलेल्या आकडेवारीत नवी मुंबई शहर हे देशात ३६व्या क्रमांकावर असून शहरात मोठय़ा प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हे प्रदूषण वाढल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. विशेष म्हणजे ठाण्यातील प्रदूषण नवी मुंबईपेक्षा कमी आहे.

Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
climate changes Heat wave warning in Vidarbha
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, येत्या ४८ तासात…

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील १०३ देशांतील ३००० शहरांचा नुकताच प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा एक अहवाल सादर केला आहे. त्यात जागतिक पातळीवर मुंबई ११७ व्या क्रमांकावर असून ग्वाल्हेर आणि अहमदाबाद हे देशातील एक व दोन क्रमांकाची शहरे ठरली आहेत. चाळीस वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या नवी मुंबईत आजही मोठय़ा प्रमाणात इमारती, घरे यांची बांधकामे सुरू असून त्यासाठी लागणारे बांधकाम सहित्य याच ठिकाणी तयार केले जात आहे. त्यासाठी सिडको, जिल्हाधिकारी आणि वन विभागाने १०३ दगडखाणी सुरू करण्यास संमती दिली होती. त्यातील काही दगडखाणी बंद पडल्या असून आजही ९३ दगडखाणींची धडधड सुरू आहे. नवी मुंबई पालिका दरवर्षी पर्यावरणविषयक अहवाल सादर करीत असून सर्व अलबेल असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र जागतिक आरोग्य संघटनेने गेली सहा वर्षे केलेल्या सर्वेक्षणानुसार नवी मुंबईतील धूलिकण हे आरोग्याला सर्वाधिक घातक असल्याचे म्हटले आहे. दगडखाणी, बांधकाम, कारखाने यातून निर्माण होणारे प्रदूषणाची मात्रा नवी मुंबईत जास्त असून धूलिकणाची मात्रा २.५ पीएम (पर्टिक्युलर मॅटर)पेक्षा कमी आहे. यामुळे नवी मुंबईत आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या असून सिडको किंवा पालिका हे धूलिकणाचे आक्रमण रोखण्यास अपयशी ठरली आहे. त्यात अलीकडे देवनार, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथील क्षेपणभूमीवरील दरुगधी व हवेच्या प्रदूषणाने नवी मुंबईकरांचा जीव मेटाकुटीस आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास वाढला असून सिमेंटच्या जंगलात हिरवळ कमी झाली आहे. त्यात पालिकेने सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करून पाणी झिरपण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवून टाकले आहेत. त्यामुळे प्रदूषणाबरोबरच नवी मुंबईतील तापमानही वाढू लागले आहे.

३०००

शहरांचा नुकताच प्रदूषणाचा आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचा एक अहवाल सादर केला

११७

जागतिक पातळीवर मुंबई शहराचा क्रमांक आहे.

१०३

दगडखाणी सुरू करण्यास वन विभागाची संमती.

९३

दगडखाणींची धडधड आजही नवी मुंबईत सुरू.