News Flash

नवी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली

जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणोरे मोरबे धरण निम्मे रिकामेच होते.

‘मोरबे’च्या पाणीसाठय़ात २३ टक्के वाढ

नवी मुंबई : जुलै महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी नवी मुंबईला पाणीपुरवठा करणोरे मोरबे धरण निम्मे रिकामेच होते. त्यामळे या वर्षी पाणी कपात करावी लागते की काय अशी चिंता पालिका प्रशासनाला होती. मात्र गेल२ चार दिवस पडत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठय़ात २३ टक्के वाढ झाली आहे. १२ जुलैला मोरबेत अवघे ४२ टक्के पाणीसाठा होता आता ६४.३९ टक्के पाणीसाठा आहे.

या धरणातून शहरातील पाणीपुरवठय़ासाठी प्रतिदिन ४२० एमएलडी पाणी वापरले जात आहे. त्यातून नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील ७ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो. मागील काही वर्षांपासून जुलै अखेर किंवा ऑगस्टमध्येच धरण पूर्ण क्षमतेने भरत आहे. मात्र मागील वर्षी पाऊस लांबल्याने ९५ टक्के धरण भरले होते. यंदाही जूनमध्ये पावसाने सुरुवात केली. मात्र पुढे दडी मारली. त्यामुळे १२ जुलैपर्यंत धरणात फक्त ४२ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे पाणी कपातीचे संकट होते. मात्र गेली काही दिवस पडत असलेल्या पावसाने धरण क्षेत्र सुखावले असून मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. या धरणाची क्षमता ८८ मीटर असून आतापर्यंत ८०.४० मीटर पाणीसाठा जमा झाला आहे. एकूण ६४.३९ टक्के धरण भरले आहे आणि धरण क्षेत्रात जर पावसाचा जोर असाच राहिला तर येत्या दिवसात हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल असे मत पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता वसंत पडघम यांनी व्यक्त केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:22 am

Web Title: navi mumbaikars water worries are gone ssh 93
Next Stories
1 वाहनांचे सुटे भाग विकणाऱ्यांकडून पामबीच मार्गावर ‘कोंडी’
2 आणखी पाचशे रुग्णशय्या
3 पुनर्वसन न झाल्यास जलसमाधी
Just Now!
X