दिघा येथील अनधिकृत बांधकामप्रकरणी नगरसेवक नवीन गवते याचा जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने फेटाळला. यामुळे गवते याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी बांधकाम व्यवसायिकांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायलयाने दिल्यांनतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये ५८ बांधकाम व्यवसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या बांधकाम व्यावसायिकांमध्ये नगरसेवक नवीन गवते याचा समावेश आहे.
अटक टाळण्यासाठी गवते याने ठाणे सत्र न्यायलयातून जामीन मिळवला होता. मी इमारत उभारली नसून ती माझ्या नातेवाईकांनी बांधली असल्याचे प्रतिज्ञापत्र त्याने ठाणे न्यायलयात सादर केले.
पोलीसांनी हे प्रतिज्ञापत्र खोटे असल्याचे सागंत तसे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यामुळे गवते याचा जामीन न्यायालयाने फेटाळल्याचे रबाळे एमआयडसीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगितले.