खासदार सुप्रिया सुळे यांची टीका
नवी मुंबई : गणेश नाईकांचा संपर्क आतरराष्ट्रीय गुंडांशी असल्याचे त्यांनीच जाहीर केले असून हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने याबाबत ‘एसआयटी’ चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तशी मागणी करणार असल्याचे बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुपिया सुळे यांनी गुरुवारी वाशी येथे झालेल्या कार्यक्रमात सांगितले.
विष्णूदास भावे नाटय़गृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. या मेळाव्याला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे आदी राष्ट्रवादीचे नेतेही उपस्थित होते.
गणेश नाईकांनी काही दिवसांपूर्वी मी गुंडाच्या शाळेचा मुख्याध्यापक आहे, आंतरराष्ट्रीय गुंडही मला ओळखतात असे वक्तव्य जाहीर सभेत केले होते.
यावर भाष्य करताना सुळे यांनी मी नाईकांवर टीका करणार नाही, मात्र त्यांनी केलेले वक्तव्य शहराच्या व राज्याच्या दृष्टीनेही घातक आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपण तसा एक ठराव देऊ व देशाच्या गृहमंत्र्यांना याबाबत चौकशी करावी अशी मागणी करणार आहोत. याबाबत लोकसभेत प्रश्न नक्की उचलून धरेल, असे सुळे यांनी शेवटी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2021 12:15 am