News Flash

नेरूळ-उरणच्या रेल्वेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

सदर प्रकल्प वेगाने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

सिडको आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा सहभाग; दिवे, पंखे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी

नेरुळ-खारकोपर मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी सिडको व रेल्वेचे प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सोमवारी रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पातील स्थानकांची पाहणी केली. या दौऱ्यात मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. तिवारी, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता एस. एस. केडीया व मध्य रेल्वे व सिडकोचे रेल्वे प्रकल्प मुख्य अभियंता एस. के.चौटालिया व इतर अधिकारीही सहभागी झाले. सदर प्रकल्प वेगाने आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या अनुषंगाने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांच्या दिवे, पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे, वॉटर कुलर, तिकीट खिडकी, फलाट अशा विविध विकासकामांची पाहणी केली. रेल्वेच्या अखत्यारीतील पुढील कामांसाठी स्थानकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात त्यांनी सिडको अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या सर्व स्थानकांचे सिडकोकडील काम पूर्ण करून पुढील कामे रेल्वेने करावयाची असल्यामुळे त्यांना सहकार्य करण्यासंदर्भातही लोकेश चंद्र यांनी सूचना दिल्या. तरघर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाले तरी पहिल्या टप्प्यात या स्थानकावर उपनगरीय रेल्वे थांबणार नाही. खारकोपपर्यंतची रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी सिडको व रेल्वे या दोन्ही यंत्रणा प्रयत्नशील आहेत. सीवूडस् ते खारकोपर या पहिल्या टप्प्याचे अंतर १२ किमी असून पुढे खारकोपर ते उरण हे अंतर १५ किमी आहे. एकूण २७ किमीचे हे रेल्वे जाळे विकसित करण्यासाठी सिडको व रेल्वे विभागाकडून अनुक्रमे ६७ व ३३ टक्के गुंतवणूक करण्यात येत आहे. एकूण एक हजार ७८२ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प असून यात चार उड्डाणपूल, १५ सबवे मार्गिका आणि रस्त्यांचा समावेश आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर दुहेरी फलाट, प्रवाशांसाठी सबवे, पिण्याचे पाणी, रेल्वे कार्यालये आणि संलग्न सुविधा व फोरकोर्ट एरियाचा विकास या सर्व विकासकामांचा समावेश आहे. पाहणी दौऱ्यात सिडकोचे मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) एस. के. चौटालिया, अतिरिक्त मुख्य अभियंता शीला करुणाकरन, अधीक्षक अभियंता एम. पी. पुजारी, अधीक्षक अभियंता व्ही. टी. रवि उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:54 am

Web Title: nerul uran railway authorities examined
Next Stories
1 सिडकोतील ४२ अधिकाऱ्यांची जातप्रमाणपत्रे बनावट?
2 गौरी-गणपतींना निरोप
3 जनजागृतीसाठी स्वच्छतागीत
Just Now!
X