04 August 2020

News Flash

नवी मुंबईत ३०८ नव्या करोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू  

८ हजार ३५७ जण करोनामुक्त

जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयसीसीच्या नवीन नियमाप्रमाणे क्रिकेट बोर्ड एका दौऱ्यावर जाताना मोठा संघ पाठवत आहेत.

सध्या देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांच्याही संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात शुक्रवारी ३०८ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजार ९०७ झाली आहे.

दरम्यान, शहरात आज ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३७० वर पोहोचली आहे. शहरात आतापर्यत तब्बल ८ हजार ३५७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ४ हजार १८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत. शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर असून पालिकेने मिशन ब्रेक द चेन मोहिम सुरू केली आहे. तर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज वाशी येथील करोना रुग्णालयाला भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 9:10 pm

Web Title: new 308 coronavirus patients found in navi mumbai more than 8 thousand patients recovered jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सिडकोच्या साडेतीन हजार घरांचे लवकरच वाटप
2 ६९५२ रुग्ण, लाभार्थी फक्त ६४
3 जुन्या आयुक्तांच्या संचिकांना नव्या आयुक्तांकडून चाप
Just Now!
X