कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाणारे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि शुक्रवारी नियुक्त झालेले नवीन पोलिस आयुक्त हेमंत नगराळे हे तीनही सनदी अधिकारी नवी मुंबईचा कायापालट करणार असा आशावाद व्यक्त केला जात आहे. नवी मुंबईच्या इतिहासात पाहिल्यांदाच प्रशासन व कायदा सुव्यवस्था साभांळणारी पुरोगामी विचाराची टीम कार्यरत झाली आहे. त्यामुळे विमानतळा सारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या प्रकल्पाबरोबरच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा विस्तार खोपोली, खालापूर पर्यंत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीन अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने..

भूषण गगराणी,  व्यवस्थापकीय संचालक सिडको

  • विमानतळाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करणे ’ नेरुळ उरण रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास नेणे ’ बेलापूर ते पेंदार मेट्रो रेल्वेची सुरुवात करणे ’विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुर्नवसन करणे ’ जेएनपीटी विस्तार यशस्वी करण्यास सहकार्य करणे ’ नैना क्षेत्राचा लवकरात लवकर विकास आराखडा मंजूर करुन घेणे ’देशातील पहिल्या स्मार्ट सिटीची संकल्पना रुढ करणे

तुकाराम मुंढे, आयुक्त, नवी मुंबई पालिका

  • शहरातील पार्किंगचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे ’ बेकायदेशीर बांधकामांना र्निबध घालणे, वाढत्या झोपडय़ांवर नजर ’ पदपथांना मोकळा श्वास घेण्यास फेरीवाला मुक्त करणे ’ पेव्हर ब्लॉकचे भूत उतरविणे ’ सिमेंट क्रॉक्रिटच्या कामांची चौकशी करणे ’अवास्तव खर्चाला कात्री लावणे ’ पाण्याचे ऑडिट करुन चौकशी करणे ’ भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणणे

हेमंत नगराळे,  आयुक्त, नवी मुंबई पोलिस

  • सोनसाखळी हिसकावणे व घरफोडय़ांना आवर घालणे ’ पांढरपेशा गुन्हेगारीला आळा ’ विकासकांकडून फसविलेल्या हजारो ग्राहकांना दिलासा ’ नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचा विस्तार ’ सागरी सुरक्षा वाढविणे ’ जादा पोलिस कुमक ’लेडिज बारवर करडी नजर