तिप्पट भाडे भरून परदेशी नागरिक खैरणे, बोनकोडेत वास्तव्यास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षण वा नोकरीचा व्हिसा घेऊन अनेक नायजेरियन नागरिक नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. मात्र शिक्षणाचा हेतू पूर्ण न करता ते अमली पदार्थाची विक्री आणि ऑनलाइन लॉटरी फसवणुकीच्या प्रकरणांत सामील आहेत. पोलीस तपासातून या गोष्टी उजेडात आल्या आहेत. त्यामुळे नायेजरियन लोकांना घरे न देण्याचे अनेक गावात ठरवण्यात आले होते. मात्र गेले काही महिने अशा परदेशी नागरिकांची वर्दळ बोनकोडे गावात वाढली आहे. भाडेकरू म्हणून राहताना हे नागरिक घरमालकांना रग्गड भाडे अदा करतात. त्यामुळे अशा प्रकारांना ऊत आला आहे. हे सारे करताना गावातील तरुणांचा विरोध पत्करून काही घरमालक नायजेरियन नागरिकांना घरे देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बोनकोडे व खैरणे परिसरात तत्कालीन उपायुक्त शहाजी उमाप यांनी नायझेरीयन नागरिकावर कारवाई केली होती. यात सुमारे ५५ नायजेरियन महिला आणि पुरुष मद्यपान करून एका घरात धिंगाणा घालीत असल्याचे उजेडात आले होते. या कारवाईत पोलिसांच्या हाती केवळ दोनच नायजेरियन नागरिक लागले होते. बाकीच्यांनी पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेले होते. त्यानंतर परदेशी नागरिकांना भाडेतत्त्वावर जागा देणे बंद केले होते.

आता नव्याने हे नागरिक बोनकोडे येथे फिरताना दिसत आहेत. या नागरिकांनी घरमालकांना तिप्पट ते चौपट भाडे अदा करून धर मिळवत आहेत. यात सर्वाधिक नायजेरियन नागरिक हे बोनकोडे गावात आहेत. हे नागरिक सध्या अमली पदार्थ विक्री, देहविक्रय आणि विदेशी वस्तूंचा बेकायदा व्यवसायात गुंतले आहेत. त्यांची मोठी दहशत नागरिकांमध्ये असते. मात्र पोलिसांकडून परदेशी नागरिकांवर कारवाई होत नसल्याचा आरोप गावातील काही तरुणांनी केला आहे.

नायजेरियन नागरिकांचे पारपत्र तपासणी गरजेची आहे. त्याशिवाय ते भारतात बेकायदा राहत आहेत की नाही, ते कळणार नाही, असे  पोलीस सूत्रांनी सांगितले. यापूर्वी खारघर परिसरामध्ये नायजेरियन टोळीने नागरिकांवर हल्ला केला होता.वाशी महामार्गावर एका अट्टल गुन्हेगार असलेल्या पुणे येथे पळून जाणारम्य़ा नायजेरियन टोळीचा मुसक्या आवळल्या नंतर या टोळीने अनेक गंभीर गुन्हे केल्याचे उघडकीस आले होते.

बेकायदा मद्यविक्री

जुहू गावात बेकायदा हॉटेल थाटून मद्यविक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकावर कारवाई करण्यात आली आहे. लॉटरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा अनेक गुन्ह्यात तसेच बँकाच्या नावाने फसवणुकीचे अनेक गुन्हे नवी मुंबई शहरात सर्वच पोलीस ठाण्यात दाखल आहेत. कोपरखैरणे येथे स्थानकासमोरील एका बारमध्ये थेट पहिल्या माळ्यावरून मद्याच्या बाटल्या फेकत रात्री नायजेरियन टोळीने नागरिकांत दहशत निर्माण केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nigeria terror in navi mumbai
First published on: 25-09-2018 at 00:02 IST