09 March 2021

News Flash

खासगी रुग्णालयात ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा

जास्त लक्षणे असलेल्या करोना रुग्णांसाठी इतर औषधांप्रमाणे ‘रेमडेसिवीर’ या इंजक्शनची आवश्यकता असते.

संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई महापालिका रुग्णालयांत पुरेसा साठा

नवी मुंबई : नवी मुंबईतील औषधांच्या दुकानात सध्या करोना रुग्णांचे नातेवाईक ‘रेमडेसिवीर’ या इंजिक्शनसाठी वणवण करीत आहेत. मात्र ती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबई महापालिकेकडे मात्र पुढील दोन महिने पुरतील ऐवढा साठा असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

जास्त लक्षणे असलेल्या करोना रुग्णांसाठी इतर औषधांप्रमाणे ‘रेमडेसिवीर’ या इंजक्शनची आवश्यकता असते. त्यात इतर आजार असलेल्या करोना रुग्णांना याची जास्त गरज असते. करोनामुळे मृत्यू होत असलेल्या रुग्णांमध्ये ज्यांना इतर आजार आहेत, त्यांच्या जास्त समावेश आहे. त्यामुळे अशा रुग्णांचे नातेवाईक या औषधासाठी सध्या शहरातील औषध दुकानांत वणवण करीत असल्याचे चित्र आहे. खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल केल्यानंतर प्रथम एक औषधांची यादी नातेवाईंकांना दिली जाते. यात प्राधान्याने ‘रेमडेसिवीर’ या इंजेक्शनचाही समावेश असतो. त्यामुळे नातेवाईक ते मिळत नसल्याने शहर फिरत आहेत. मात्र ते उपलब्ध होत नाही. याबाबत काही औषध दुकानदारांना विचारणा केली असता, नाशिक तसेच कोकणातूनही या औषधाची विचारणा होत असल्याचे सांगण्यात आले. ४५०० ते ५४०० रुपये किंमत असलेले हे ‘रेमडेसिवीर’ काळ्याबाजार करून ३० हजार रुपयांपर्यत विकले जात असल्याचे बोलले जात आहे.

या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता, पुढील २ महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक रुग्णाला याची आवश्यकता नसते. अत्यवस्थ रुग्णांनाच ती दिली जातात. पालिकेकडे सुरुवातीच्या टप्प्यात एक हजार इंजेक्शन होती. ती इंजेक्शन दीड महिन्यापर्यंत पुरेशी ठरली. आता आणखी साठा उपलब्ध झाला असून पालिकेकडे २५०० इंजेक्शन आहेत. ती पुढील दोन महिने पुरतील असे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

महाराष्ट्रात या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून अनेक जिल्ह्यांतून विचारणा होत आहे. परंतु इंजेक्शनच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे काळाबाजार होण्याची शक्यता आहे. पालिका वगळता खासगी रुग्णालयात हे इंजेक्शन उपलब्ध नाही.

 – राजू जाधव, केमिस्ट असोसिएशन नवी मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 12:30 am

Web Title: nmmc palika lack of remedesivir in private hospital akp 94
Next Stories
1 बेकायदा कोविड रुग्णालयाला कारणे दाखवा
2 नवी मुंबईही जलमय
3 बेलापूरमधील १०० दुकाने पाण्यात
Just Now!
X