नवी मुंबई : देशपातळीवर सुरु  असलेल्या स्वच्छता अभियानात वरिष्ठ अधिकाऱ्य्यांचा दबाव आणि स्वच्छता अभियान परीक्षण समितीच्या धास्तीने नवी मुंबईत अनेक ठिकाणी कचरा टाकू नये म्हणून राखणदार उभे करण्यात आले आहेत. हे राखणदार पूर्वी कचराकुंडय़ा असलेल्या ठिकाणी कचरा टाकण्यास मज्जाव करीत आहेत.

स्वच्छता अभियानाच्या पहिल्याच स्पर्धेत नवी मुंबई राज्यात पहिला तर देशात सातवा क्रमांक पटकवला होता. मात्र या मोहिमेबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती वाढल्याने राज्यात आणि देशातही अनेक शहरे स्पर्धक म्हणून नवी मुंबईसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्वच्छता मोहिमेवर भर दिला आहे.

शहरात अनेक ठिकाणी कचरा कुंडय़ा होत्या मात्र हळू हळू त्या काढून टाकण्यात आला त्याच बरोबर कचरा रस्त्यावर पडू नये म्हणून रोजच ठरविक वेळेत घरोघरी घंटा गाडय़ा फिरवण्यात येत आहेत. मात्र तरीही वर्षांनुवर्षे ज्या ठिकाणी कचराकुंडय़ा होत्या त्या काढल्या तरीही त्याच ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने कचरा टाकण्यास मनाई केली. आधी कचऱ्याची ठिकाणे नंतर कचरामुक्त पालिकेने जाहीर केले. अशी ५३ ठिकाणांचा यात समावेश आहे. अशा सर्व ठिकाणी राखणदार उभे करण्यात आले आहेत.

स्वच्छता समितीचे पथक सध्या फिरत असले तरी ते कोण आहेत कुठे जाणार आहेत कधी जाणार आहेत या बाबत माहिती गोपनीय राखली जात असल्याने मनापाने हे राखण्दारांची नेमणूक केली आहे. अनेक ठिकाणी कचरा टाकू नये हे आवाहन करण्यासाठी कामगार ठेवण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.