X

एनएमएमटीच्या ताफ्यात  ३० नव्या मिनी बसगाडय़ा

नवी मुंबई परिवहन उपक्रमात आता ३० नव्या मिनी बसगाडय़ांची भर पडली आहे.

जुन्या २० सीएनजीवरील बसगाडय़ाची सेवा बंद

नवी मुंबई परिवहन उपक्रमात आता ३० नव्या मिनी बसगाडय़ांची भर पडली आहे. या सर्व बसगाडय़ा आसूडगाव आणि तुर्भे आगारात वर्ग करण्यात येणार आहेत. या दोन्ही आगारांतून मार्गक्रमण करणाऱ्या बसगाडय़ांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. नव्याने दाखल झालेल्या ३० मिनी बसगाडय़ा दाखल झाल्या असल्या तरी जुन्या २० सीएनजी बसगाडय़ांची सेवा थांबविण्यात आली आहे.

रस्त्यात वारंवार बसगाडय़ा बंद पडत असल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळत होते. काही वर्षांपूर्वी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक म्हणून सीएनजीच्या बसगाडय़ांची खरेदी जोमात करण्यात आली होती, मात्र सीएनजी बसगाडय़ा अधिक खर्चीक आणि वारंवार बिघाड होणाऱ्या असल्याचा अनुभव आल्यानंतर एनएमएमटी प्रशासनाने डिझेलवरील बस घेण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने टप्प्याटप्प्याने जुन्या बस काढत नवीन बस घेण्यात आल्या. आज ३० मिनीबस एनएमएमटीच्या ताफ्यात रुजू झाल्या आहेत. या बसचा लोकार्पण सोहळा कोपरखैरणे आगारात पार पडला.

अंशत: स्वयंचलित

या ३० बस आयशर व्होल्व्हो प्रकारच्या या बसगाडय़ा अंशत: स्वयंचलित आहेत. आहे.सध्या ७० विविध मार्गावरून एनएमएमटी बसगाडय़ांमार्फत पुरवली जाणार आहेत. त्यातील मार्ग क्रमांक ८, २१ व २२ अशा छोटय़ा रस्त्यांवरून धावणार असल्याचे एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले.